पान:संपूर्ण भूषण.djvu/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ श्रीशिवराज-भूषण आशीर्वचन–कवित मनहरण एक प्रभुता को धाम, सजे तीनौ, वेद काम, रहै पंच आनन षडानन सरवदा । सातौ वार आठौ याम जाचक नेवाजै नव अवतार थिर राजै कृपन हरि गदा सिवराज भूषन अटल रहे तो लौं जौल त्रिस भुवन सब गंग औ नरमदा । साहि तनै साहसिक भौसिला सुरज बंस दाशरथि राज तौलौ सरजा थिर सदा ।। ३८१ ।। प्रभुतेचे एक मात्र धाम जे परब्रह्मस्वरूप ते सुस्थिर राहो, ( किंवा तिन्ही वेदांचे ध्येय जे एक व प्रभूचे धाम प्राप्त करून घेणे ते त्याँस प्राप्त होवो), पंचानन-महादेव व षडानन-कार्तिकस्वामी चिरकाल राहोत. सात वार, अष्टौप्रहर याचवर कृपा होवो. नऊ अवतार अखंड विराजमान होवोत. तसेच हरि आपल्या कृपाण आणि गदा यसह सुस्थिर राहो. शिवराज-भूषण ( हा ग्रंथ किंवा शिवराय व भूषण कवीची जोडी, किंवा शिवराय ) त्रिदुश भुवने, गंगा आणि नर्मदा आहेत तोवर निश्चल राहो. शहाजीपुत्र धाडशी भोंसलेराज, सूर्यवंशी दाशरथी रामचंद्राचे राज्य असेपावेतों अर्थात् चिरकाल सुस्थिर राहो. (३८१) । समाप्ति झाली असा मिश्रबंधुंचा तर्क आहे. त्यांच्या प्रतीतील दोश्याचा पाठ खालीलप्रमाणे आहे. सुभ सत्रह तीस पर बुध सुदि तेरसि भान । भूषण सिव भूषन कियो पढियो सुनो सुजान ।। संवत् १७३० शुद्ध त्रयोदशी बुधवारी भूषणाने ‘शिवराज-भूषण' रचिले, सुजाण लोक हो ! वाचा व ऐका. [ भा. इ. स. मं. पुरस्कृत ग्रं.४-‘शिवचरित्र प्रदीप' पृष्ठ ३०४ पहा. प्रदीपातील श्री० दिवेकर यांचा यासंबंधीचा खुलासा श्री० त्रिपाठीजींच्या व मुंबईच्या प्रतीशी जुळतो.]