पान:संपूर्ण भूषण.djvu/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण १३४ | वक्रोक्ति जान सुभाव उक्ति हु भाविको निरधारि ।। भाविक छबि हु सु उदात्त कहि अत्युक्ति बहुरि विचारि३७८ बरने निरुक्तिहु हेतु पुनि अनुमान'ce कहि अनुप्रास'०' । भूषन भनत पुनि जमक°२ गनि पुनरुक्तिवद°3 आभास ॥ युत चित्र'०४ संकर'०५ एक सत भुषन कहे अरु पांच* । लाख चारु ग्रंथन निज मतो युत सुकवि मानु हु साँच ।। ३७९ ॥ दोहा सम सत्रहसै तीस पर, सुचि वदि तेरासि भान । भूषन सिव भूषन कियो पढियो सकल सुजान ॥ १८० ॥ संवत १७३० ज्येष्ठ वद्य १३ रिववारी भषणानें “शिवराज-भूषण ( काव्य) रचिलें; सर्व सुजाण लोक हो ! वचा. (३८०) | * छंद ३७१ पासून ३७९ पावेतों शिवराज-भूषणामध्ये वर्णन केलेल्या अलंकारांची अनुक्रमणिका कवीने स्वत:च दिली अाहे. छंद क्र. ३७९ मध्ये एकंदर अलंकारची संख्या एकशें पांच' आहे असे कवीने म्हटले आहे. परंतु मूळ काव्यांत अलंकारांची संख्या अधिक आहे. लुप्तोपमा, न्यूनाधिक रूपक के गुप्तोत्प्रेक्षा या अलंकारांची लक्षणे व उदाहरणे कवीने दिली असून वरील अनुक्रमणिकेत ( नामावलीत ) यांचा उल्लेख नाहीं; यावरून या अलंकारांस कवीनें मुख्य अलंकार मानिलें नाहीं असे दिसते. छंद क्र. ३८० मध्ये कवीनें “शिवराज-भूषणाचा समाप्तिकाल दिला आहे. स्या समाप्तिकालासंबंधी बराच मतभेद आहे. त्रिपाठी-संपादित प्रतीतील दोह्यांवरून हा काल संवत् १७३० अषाढ वद्य १३ रविवार' असा निघतो. मिश्र बंच्या प्रतींतील दयविरून संवतात तर काही अंतर नाही. त्यांच्या मते कवीने महिना लिहिला नाही, फक्त शुद्ध त्रयोदशी बुधवार असे लिहिले आहे. त्या संवतांत शुद्ध त्रयोदशी बुधवारी श्रावण व कार्तिक या महिन्यांत आलेली आहे. कतिकतिील त्रयोदशी १४ घटका ५५ पळे हेती व श्रावणातील त्रयोदशी ३६ घटका ४० पळे होती. यावरून श्रावण मासांतील शुद्ध त्रयोदशीला ग्रंय...