पान:संपूर्ण भूषण.djvu/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ शिवराज-भूषण

ज्याची रचना अशी विचित्र असते की, पाहिलें किंवा ऐकले असता आश्चर्य वाटते; त्यास 'चित्र' अलंकार म्हणतात; त्याचे कामधेनु' इत्यादि ३ पुष्कळ प्रकार आहेत. (३६७) कामधेनू-चित्रालंकार-माधवी सवैया धुव जो गुरततिनको गुरु भूषन दानि बड़ोगिरजा पिव है। हुव जोहतारिनको तरु भूषनदानि बडो सिरजाछिच है ॥ भुव जोभरतादिनको नरु भूषन दानि बड़ोसरजा जिव है। तुव जो करता इनको अरु भूषनदानि बड़ोबरजा निव है॥३६८॥ [ ह्या छंदाचा शब्दार्थ लक्ष्यत येतो; पण वाक्यर्थ सुसंगत निघत नाहीं. सबब येथे शब्दार्थ दिला आहे. धुव = ध्रुव ( भक्त ), निश्चय करून; गुरता=गौरव; बिरजा पिव = व्रजाला प्रिय असणारा कृष्ण, (गिरजा प्रिय असाहि पाठभेद आहे, तेथे गिरिजाप्रिय शंकर असा अर्थ होतो;) हुव = झाला; हरता = हरण करणारा; अरन = ऋण; तरु-भूषण = कल्पवृक्ष; सिरजा = सृष्ठ, निर्मित; छिव छबि, जन्मत: भुव भरता = पृथ्वीचे भरण-पोषण करणारा; दिन को = सांप्रतचा: नरु-भूषन = मानवाचे भूषण; तुव = तू; अरु = आणि; वर जानिव है = जाणता आहे (३६८) | चित्रालंकातील ही कामधेनु नामक प्रकार आहे. चित्रालंकार नसते लक्षणांत भूषणाने वर्णन केल्याप्रमाणे पाहण्याऐकण्याचेच असतात. त्यांच्या अर्थात् कांहींच स्वारस्य नसते. शब्दांची ओढाताण करून कसा तरी व काही तरी अर्थ जमवावा लागतो. दिलेल्या शब्दार्थावरून साधारणपणे ह्या छंदाची कल्पना होईलच. १०५ संकर-लक्षण, दोहा भूषन एक कवित्त मैं भूषन होत अनेक। संकर ताको कहते हैं जिन्हें कवित की टेक ॥ ३६९ ॥