पान:संपूर्ण भूषण.djvu/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण

=

= = पुण्यति ( शायस्तेखान वगरेची ) झालेली दुर्दशा ऐकून इतर सरदार वायुवेगाने पळाले. यशस्वी व रजपूत-पति जो जसवन्तसिंग (ज्याचे बरोबर कित्येक रजपूत सरदार होते) त्याशी युद्ध केले. भूषण म्हणतो, हे भोंसलेकुलभूषण शिवराज ! याप्रमाणे शंकरांनीं तुझ्या राज्याची अभिवृद्धि केली आहे. नऊ खंड व सप्तद्वीप भूतलाचा दीपक व सांप्रतच्या दिल्लीपतीस त्रास देणारा दिलीप तुंच आहेस. (३६४) | १०३ पुनरुक्तिवाभास-लक्षण, दोहा भासत है पुनरुक्ति सी, नहिं निदान पुनरुक्ति । | वदाभास-पुनरुक्ति सो, भूषन बरनत युक्ति ॥ ३६५ ॥ जेथे पुनरुक्तीचा नुसता भास होतो, वस्तुतः पुनरुक्ति होत नाही तेथे ‘पुनरुक्तिवदाभास अलंकार होतो. (३६५) उदा०-कवित्त मनहरण । अरिन के दल सैन संगर मैं समुहाने टूक टूक सकल कै डारे घमसान मैं । बार बार रुरो महान परबाह पूरो बहुत हैं हाथिन के मद जल दान में ॥ भूषन भनत महाबाहु भौसिला भुवाल सूर, रवि कैसो तेज तीखन कृपान में । मालमकरन्द जू के नन्द कलानिधि तेरो सरजा सिवाजी जस जगत जहान मैं ॥ ३६६ ॥ युद्धति शत्रुसैन्याशी सामना करून त्याचे तुकडे तुकडे केले; हत्तीच्या गंडस्थळातील मजलाचा पूर अनेक वेळी वाहविला. भूषण म्हणतो, भोसलेराज महाबाहू शूर (शिवराजाच्या) कृपाणाचे तेज सूर्याप्रमाणे प्रखर आहे. हे मालोजीपुत्र शहाजी ! तुझ्या शिवाजी सरजाचा यशचंद्र जगताला जागवीत आहे. (३६६) | १०४ चित्र-दोहा लिखे सुने अचरज बढे, रचना होय विचित्र । कामधेनु आदिक घने, भूषन बरनत चित्र ।। ३६७ ॥