पान:संपूर्ण भूषण.djvu/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ श्रीशिवराज-भूषण मुंड कटत कहुँ रुंड नटत कहुँ सुंड पटतघन । गिद्ध लसत कहुँ सिद्ध हँसत सुख वृद्धि रसत मन ॥ भूत फिरत करि बूत भिरत सुर दूत घिरत तहँ । चंडि नचत गन मंड रचत धुनि डाँड मचत जहूँ॥ इमि ढानि घोर घमसान अति भूषन तेज कियो अटल। सिवराज साहि सुव खग्ग बल दाल अडोल बहलोल दल ॥ ३५८ ॥ L भूषण म्हणतो, शहाजी पुत्र शिवरायाने बहलोलखानासारख्या अट्टल सरदाराच्या सैन्याशी आपल्या तरवारीच्या जोरावर भयंकर युद्ध करून त्याची अशी दुर्दशा करून सोडली की, कुठे वीरांची मुंडकीं उडत आहेत तर कुठे धडे नाचत आहेत, कुठे हत्तींच्या सोंडा तुटतुटून पड़त आहेत तर कुठे गिधाडे ( आपली खाण्याची चंगळ झाली म्हणून ) संतुष्ट होत आहेत. (प्रेतावर बसून साधने करणारे) योगी ( आपली साधनें सुलभ झाल्यामुळे ) आनंदित झाले आहेत. भुते इकडे तिकडे फिरून ( वीस स्वर्गात नेण्याकरिता आलेल्या) देवदूताँत मिसळण्याचा प्रयत्न करीत आहेत; चंडि देवी (बली मिळाल्यामुळे प्रसन्न होऊन) नाचत आहे,आणि शिवगण आपली मंडळी जमवून टिप-याचा हलकल्लोळ माजवून देत आहेत. (३५८) क्रुद्ध फिरत अति युद्ध जुरत नाहं रुद्ध मुरत भट। खग्ग बजत अरि बग्ग तजत सिर पग्ग सजत चट ॥ ढुक्क फिरत मद झुक्कि भिरत करि कुकि गिरत गनि । रंक रकत हर संग छकत चतुरंग थकत भनि ॥ इमि करि संगर अति ही विषम भूषन सुजन कियो अचल । सिवराज साहि सुव खग्ग बल दाल अडोल बहलोल दल ॥३५९ ।। भूषण म्हणतो, अतिशय क्रुद्ध होऊन ते (शिवाजीचे) योद्धे लढत आहेत. एक पाऊल देखील मागे सरकत नाहींत. ह्या वीरांच्या तरवारीचा खणखणाट होताच शत्रू आपल्या हातातील लगामाचे दोर सोडून देतात. डोक्यावरील पागोटें चटदिशीं सावरतात, व लपून छपून फिरू लागतात; पण (शिवाजीच्या वीरशीं) लढतच मदोन्मत्त हत्तीप्रमाणे किंकाळ्या फोडून