पान:संपूर्ण भूषण.djvu/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आाशवराज-भषण ११८ दूरस्थित वस्तूचे प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे जेथे वर्णन केले जाते तेथे ‘भाविक छबि' अलंकार होतो. (३३३) उदा०–मालती सवैया सूबन साजि पठावत है नित फौज लखे मरहट्टन केरी ।। औरंग आपनि दुग्ग जमाति विलोकत तेरियै फौज दरेरी ॥ साहि तनै सिव साहि भई भनि भूषन यों तुव धाक घनेरी। रातहु द्यौस दिलीस तकै तुव सैन कि सूरति सूरति घेरी॥३३४॥ मराठ्यांची नित्यशः येत असलेली फौज पाहून औरंगजेब सुभेदार ( सरदार ) लोकांना ( सैन्यादिकोनी ) सज्ज करून पाठवीत आहे. भूषण म्हणतो, हे शहाजीपुत्र शिवाजी ! औरंगजेब अापल्या किल्ल्याँस तुझ्या फौजेने घेरलेलेच पहातो. त्यामुळे तुझा दर्प असा बसून गेला आहे की, दिल्लीपती ( औरंगजेब ) रात्रंदिवस तुझ्या सैनिकांकडे निरखून पहात आहे. (तरीपण तुझ्या सैनिकांनी शेवटीं) सुरतेला वेढा दिलाच. (३३४) ९६ उदात्त-लक्षण, दोहा अति संपति बरनत जहाँ, तास कहत उदात। कै आने सु लखाइये, बड़ी आने की बात ॥ ३३५॥ जेथे अति सम्पत्तीचे वर्णन करण्यात येते अथवा श्रेष्ठचे अन्य प्रकारें महत्त्व दाखविले जाते तेथे ‘उदात्त' अलंकार जाणावा. (३३५) उदा०-कवित्त मनहरण । द्वारन मतंग दीसे आँगन तुरङ्ग होसै बन्दीजने बारन असीस जसरत हैं। भूषन बखानै जरबाफ के सम्याने ताने झालरन मोतिन के झुण्ड अलरत हैं ॥ महाराज सिधा के नेबाजे कविराज ऐसे साजि के समाज तेहि ठौर विहरत हैं। लाल करें प्रात तहाँ नीलमनि करें रात याही मौक्ति सरजा की चरचा करत हैं ॥ ३३६॥