१७ श्रीशिवराज-भूषण कुञ्जरन परो कठिन कराह है ॥ सिंह सिवराज सलहेरि के समीप ऐसो कीन्हो कतलाम दिली दल को सिपाह है। नदी रन मण्डल रुहेलन रुधिर अज अज रवि मण्डल रुहेलन की राह है ॥ ३३१ ॥ भूतनाथ ( महादेव ) अयाहि आनंदाने मुण्डमाला धारण करीत आहेत व त्यांचे गण (भुर्ते) मोठ्या उत्साहाने आहार घेत आहेत. भूषण म्हणतो, तरवारीने जखमी झालेले मोठमोठे काळे कुट्ट हत्ती ( होणान्या वेदनांनी ) किंकाळ्या फोडीत आहेत. शिवसिंहाने सालेरीजवळ दिल्लीच्या सैन्याची अशी कत्तल केली की, रोहिल्यांच्या रक्ताच्या नद्या अद्यापि वाहत आहेत व रोहिले सूर्यमंडलाकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. (३३१) उदा० २-कवित्त मनहरण गजघटा उमड़ी महा घनघटा सी घोर भूतल सकल मदजल सा पटत है। बेला छाँड़ि उछलत सातौ सिंधु वारि मन मुदित महेस मग नाचत कढ़त है। भूषन बढ़त भौसिला भुवाल को यो तेज जेतो सब बारह तरनि में बढ़त है। सिवाजि खुमान दल दौरत जहान पर आनि तुरकान पर प्रलै प्रगटत है ॥ ३३२॥ हत्तींचे कळप मेघसमुदायाप्रमाणे घोर गर्जना करून पृथ्वीवर मदरूपीं जलाचा वर्षाव करीत आहेत, सातहि समुद्र मर्यादा सोडून उसळे लागले आहेत; शंकर प्रसन्नत:करणाने नाचत बागडत आहेत. भूषण म्हणतो, भोसले राजाचें तेज सर्व ऋतूतील एकवटलेल्या सूर्यतेजाप्रमाणे सारखे वाढत आहे. शिवाजीचे सैन्य पृथ्वीवरून धावतांना तुर्कीना प्रळयकाळच ओढवला असे वाटते. (३३२) | ९५ भाविक छबिलक्षण, दोहा जहें दूरस्थित वस्तु को, देखेत बरनत कोय ।। भूषन भूषन राज भनि, भाविक छबि सो होय ॥ ३३३॥
पान:संपूर्ण भूषण.djvu/167
Appearance