पान:संपूर्ण भूषण.djvu/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ११२ उदा० २ रे-किरिटी सवैया औरंग जो चढि दक्खिन आवै तो ह्याते सिधावै सोऊ बिनु कप्पर । दीनो मुहीम को भार बहादुर छागो सहै क्य गयन्द को झप्पर ॥ सासता खाँ सँग वे हठि हारे जे साहब सातएँ ठीक भुवष्पर। ये अव सूबहू आवै सिवापर काहि के जोगी कलींदे को खप्पर ॥ ३२० ॥ औरंगजेब दक्षिणेवर चढाई करून येतो खरा, पण येथे त्यास आपल्या अंगावरील कपडादेखील गमावून जावे लागते. (म्हणून एकद) मोहिमेचा भार बहादुरखानावर सोपविला, पण तो शिवाजीपुढे कसा टिकाव धरणार ? बकरा कुठे हत्तीची धाड सहन करू शकतो ? शायस्तेखानाबरोबर असलेले ते ही वीर हरून सातव्या लोकांच्या मालकाजवळ (देवाजवळ)गेले आहेत. आता हे सुभेदार होऊन शिवाजीवर येऊ पाहात आहेत. कालचे जोगी आणि टरबुजाचे खापर' (नुकत्याच बनलेल्या जोग्यास ‘कशकोलनारळाचे बनविलेले भिक्षापात्र) कोठून मिळणार ? (यापूर्वी मोठमोठे सरदार येऊन गेले. त्यांच्याने शिवाजीचें कहींदेखील झाले नाही. मग आती है। काल बनलेले सुभेदार येऊन काय करणार ? ) (३२०) ९२ वक्रोक्ति-लक्षण, दोहा जहाँ श्लेष सो काकु सों, अरथ लगावे और। बक़ उकति ताको कहत, भूषन कवि सिरमौर ॥ ३२१ ॥ जेथे श्लेषाने अथवा प्रश्नाने ( काक्वर्थ ) दुसरा अर्थ केला जातो तेथे “वक्रोक्ति अलंकार होतो. (३२१) । उदा०-श्लेष वक्रोक्ति-कवित्त मनहरण । साहि तनै तेरे बैर बैरिन को कौतुक सौ बुझत फिरत कहौ काहे रहे ताच हौ ?। सरजा के डर हम आए इतै भाजि तब सिंह सों डराय याहू ठौर ते उकचि हौ ॥ भूषन भनत