पान:संपूर्ण भूषण.djvu/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= =

=====

== शिवराज-भूषण १०६ सकल मैं । कजल कलित अँसुवान के उमङ्ग सङ्ग दूनो होत रोज रंग जमुना के जल मैं ॥ २९९ ॥ शहाजीपुत्र शिवाजीसमोर बाहुबलत टिकणारा कोणी शत्रू राहिला नाहीं. भूषण म्हणतो, त्या भोंसल्याच्या मनातील नुसते ( प्रभावशाली ) विचार ऐकूनच औरंगजेबाच्या सैन्यातील म्लेंछ मरत आहेत. यवन स्त्रियांच्या रात्रंदिवस रडण्याने सर्व दिल्ली आणि आग्रा शोकाने व्यापून गेली आहेत; त्यामुळे काजळ मिसळलेल्या अश्रृंनी यमुनेच्या पाण्याचा रंग रोज दुप्पट काळा होऊ लागला आहे. (२९९) ८३ मीलित-लक्षण, दोहा सदृस बस्तु मैं मिलि जहाँ, भेद न नेक लखाय ।। ताको मलित कहत हैं, भूषन जे कविराय ॥३०० ॥ एकाच धर्माच्या अनेक वस्तू अशा प्रकारे एकत्रित होतात की, ज्यांच्यात यत्किचिदेखील भेद दिसून येत नाही तेथे मीलित' अलंकार होतो. (३००) उदा०–कवित्त, मनहरण इन्द्र निज हेरत फिरत गजइन्द्र अरु इन्द्र को अनुज हेरे दुगध नदीस को । भूषन भनत सुर सरिता को हंस हेरे विधि हेरै हंस को चकोर रजनीस को ॥ साहि तनै सिवराज करनी करी है तै जु होत है अचम्भो देव कोटियो तैंतीस को । पावत न हेरे तेरे जस में हिराने निज गिरि को गिरीस हेरै गिरिजा गिरीस को ।। ३०१ ॥ भूषण म्हणतो, हे शहाजीपुत्र शिवाजी ! तं जी करणी केली आहेस स्यामुळे तेहतीस कोटी देवांना आश्चर्य वाटत आहे. तुझ्या शुभ्र यशःसमुद्रत इंद्र आपला हत्ती (ऐरावत ) शोधीत आहे तर त्याचा धाकटा भाऊ वामन क्षीर समुद्र ( कुठे लपला हे ) पहात आहे. क्षीरसमुद्रास गंगा, गंगेस हंस, हंसास ब्रह्मदेव हुडकीत आहे. तसेच चकोर चंद्रास, चंद्र महा