पान:संपूर्ण भूषण.djvu/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ श्रीशिवराज-भूषण = भुषण म्हणतो, सजी शिवाजीनें वजनस असे मदोन्मत्त हत्ती (दान) दिले आहेत की, त्यांच्या गर्जनाच्या धक्क्याने पर्वतदेखील डळमळून जावे. ते (हत्ती) मस्तकावर जी धूळ फेकतात त्या वावटळी आकाशापर्यंत जातात; अगोदर ते आपल्या सोंडाँनी नर्यातील पाणी शोषून घेतात व पुन्हा गंडस्थलांतील मदाच्या रूपाने त्याच नद्या भरून टाकतात.(२९१) उदा ० ३ रे–मालती सवैया श्री सरजा सलहेरि के जूझ घने उमरावन के घर घाले। कुम्भ चॅदावत सैद पठान कबंधन धावत भूधर हाले । भूषन यो सिवराज की धाक भए पियरे अरुनै राँग वाले। लोहै। कटे लपटे अति लोहु भए मुँह मीरन के पुनि लाले ॥२९२॥ शिवाजी सर्जने सालेरीच्या युद्धात अनेक उमरावचा फडशा पाडला. कुम्भ, चंदावत, सय्यद, पठाण यांची धडे ( इकडून तिकडे ) धाँवताना पर्वत डळमळू लागतात; भूषण म्हणतो, शिवाजीच्या अशा धाकाने लाल ( गाजरासारखे ) असणारे ( सय्यद पठाणादि ) पिंवळेधमक झाले, आणि पुन्हा शस्रनीं घायाळ झाल्यामुळे त्या सरदारांची मुखें रक्ताने लाल झाली. (२९२) उदा० ४ थे—मालती सवैया यो कवि भूषन भाषत है यक तौ पहिले कलिकाल कि सैली । तोपर हिन्दुन की सब राह सु नौरंग साह करी अति मैली ॥ साहि तनै सिव के डर स तुरकौ गहि वारािध की गति पैली । वेद पुरानने की चरचा अरचा सुज देबन की फिरि फैली ।। २९३ ॥ भूषण म्हणतो, अगोदर तर कलिकालाची रहाटी; त्यातून हिन्दूंचे वागण्याचे सर्व मार्ग ( आचारादि ) औरंगजेबाने अतिशय मळिण करून टाकलेले; पण शहाजीपुत्र शिवरायाच्या दुर्गामुळे तुर्कीना समुद्रापलीकडचा