पान:संपूर्ण भूषण.djvu/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भुषण १०० नाहीसे होत नाहीं. भूषण म्हणतो, जगत शिवराय हाच एक दाता आहे व जे काहीं मागणे असेल ते त्यासच मागावें. इतरांच्या दरबारात मागावयास गेल्यास न गेल्यासारखेच आहे नाहींतर काय ? ( कारण इच्छेप्रमाणे मिळत नाहीं. ) (२८१) । ७७ अनुज्ञा-लक्षण, दोहा जहँ सरस गुन देखि कै, करे दोस की हौस । तहाँ अनुज्ञा होत है, भूषन कबि यहि रौस ॥ २८२ ॥ सरस गुण पाहून जेथे दोषाची हौस वर्णन केली जाते तेथे ‘अनुज्ञा अलंकार होतो. (२८२) उदा०--कवित्त मनहरण जाहिर जहान सुनि दान के बखान आज महा दानि साहितनै गरिब नेवाज के। भूषन जवाहिर जलूस जरबाफ जोति देखि देखि सरजाकी सुकवि समाज के ॥ तप कर करि कमलापति स माँगत यो लोग सब करि मनोरथ ऐसे साज के । बैपारी जहाज के न राजा भारी राज के भिखारी हमैं कीजै महाराज सिवराज के ॥२८३॥ भूषण म्हणतो, शहाजीपुत्र दीनवत्सल व दानशूर शिवरायाच्या दानाची चहूकडे झालेली ख्याति ऐकून, तसेच शिवरायाच्या दरबारातील कवि मंडळीचे भरजरीचे कपडे व ( अंगावरील ) जड़-जवाहिर पाहून सर्व लोक भगवान् विष्णूजवळ तपश्चर्या करून मागणे मागत असत कीं, हे लक्ष्मीपति ! आम्हाला जहाजाचा व्यापारी किंवा एकाद्या मोठ्या राज्याचा राजा करू नकोस; शिवाजी महाराजांच्या ( दरबारातला ) भिकारी केलेस तरी पुरे आहे. (२८३) ७८ लेश-लक्षण, दोहा जहँ बरनत गुन दोष कै, कह दोष शुनरूप । भूषन ताको लेस कहि, गावत सुकवि अनूप ॥२८४ ॥