पान:संपूर्ण भूषण.djvu/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ९२ ? भनत तहाँ सरजा सिवा औं चढो राति के सहारे ते अराति अमरष ते ॥ २५९।। गर्विष्ठ गौराने व घमेंडखोर राठोडाने मोठ्या धैर्याने व आनंदाने लोहगड व सिंहगड घेतला आणि त्यावर गोलंदाज व तीरंदाज (संरक्षणाकारित) ठेवून दिले. भूषण म्हणतो, हे सर्जा! त्यांची (किल्लेदारांची) घमेंड जिरविण्याकरिता आपल्या शूरवीरांस एकत्र करून त्यांचेसह मोठ्या सावधगिरीने कमरेस तरवारी लटकावून गोळ्यांचा व बाणांचा वर्षाव होत . असत रात्रीच्या वेळीं तुं हे किल्ले चढून गेलास । (२५९) | ६९ अर्थापत्ति ( काव्यार्थापत्ति )-लक्षण, दोहा। * वह कीन्ह्यो तौ, यह कहा” यों कहनावति होय । अर्थीपत्ति बखानहीं, तहाँ सयाने लोय ॥ २६० ॥ ‘तं केलें मग याची काय कथा' असे वर्णन जेथे करण्यात येते तेथे *अर्थोपत्ति' अलंकार होतो. (२६०) | उदा०-कवित्त मनहरण सयन मैं साहन को सुन्दरी सिखावें ऐसे सरजा सो बैर जनि करो महा बली है। पेसकरौं भेजत बिलायति पुरुतगाल निकै सहमि बात करनाट थली है ॥ भूषन भनत गढ़ कोट माल मुलुक दे सिवा सो सलाह राखिए तो बात भली है। जाहि देत दंड सब डरिकै अखंड सोई दिल्ली दलमली तो तिहारी कहा चली है ? ॥ ३६१ ॥ भूषण म्हणतो, रात्रीं निजतेवेळी बादशहांच्या स्त्रिया त्यांना सांगतात, “न्या सर्जाशी वैर करू नका तो महाबलवान आहे. विलायत आणि पोर्तुगाल • (बाले) खंडणी पाठवितात; हे ऐकून कर्नाटक सर्द झाला. गड, किल्ले, माल, मुलूख देऊन शिवाजीशी सलोखा ठेवण्यातच कल्याण आहे. ज्याला भिऊन सर्व (राजेरजवाडे) दंड देत असत त्या (औरंगजेबाच्या) अखंड दिल्लीचे आसन देखील डळमळलें मग तुमची कथा काय ?' (२६१)