पान:संपूर्ण भूषण.djvu/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशवराज-भूषण

=

दाक्षिणाधिपती धैर्यधारी शिवाजी किल्लेवासि धर्मद्वार देऊन त्यांना धर्मशाळा दाखवून आपण त्यांचे किल्ले घेतो. तसेच हा शहाजीपुत्र शिवाजी बादशहांना मार देऊन त्यांचे मोठमोठे देश हिसकावून घेत आहे. युद्धात शिवाजी, शत्रूसैन्याचें तेज हरण करितो. ( त्यांची हत्यारे हिसकावून घेतो ) आणि हिन्दूंचे वैभव वाढवितो. भूषण म्हणतो, भोसलेराजा, आपण यश संपादन करितो व महादेवास मुण्डमाला व त्याच्या गणसि आहार देतो. (२४५) ६४ परिसंख्या-लक्षण, दोहा अनत बरजि कछु वस्तु जहँ, बरनत एकहि ठौर। तेहि परिसंख्या कहत हैं, भूषन कवि दिलदौर २४६॥ एकाद्या वस्तूचा इतरत्र अभाव दाखवून एकाच ठिकाणी तिचे अस्तित्व | वर्णन करण्यात येते तेथे ‘परिसंख्या' अलंकार होतो. (२४६) उदा०-मनहरण दंडक अति मतवारे जहाँ दुरदै निहारियत तुरगन ही में चंचलाई परकीति है । भूषन भनत जहाँ पर लगै बानन में कोक पच्छिनहि माहि” बिछुरन रीति है। गुनि गन चोर जहाँ एक चित्त ही के, लोक बंधे जहाँ एक सरजा की गुनप्रीति । है। कम्प कदली मैं, बारि बुन्द बदली मैं सिवराज अदली क राज मैं यो राजनीति है ।। २४७ ।। भूषण म्हणतो, ज्याच्या राज्यांत उन्मत्तपणा हत्तींतच आढळून येतो. चंचलता घोड्याचे ठिकाणी दिसून येते; जेथे पंख बाणाला, व वियोग चक्रवाक पक्ष्यत दिसून येतो; तसेच, गुणीजन आणि चोर एका विचाराने वागतात; कारण सर्व लोक एका शिवाजीच्या प्रेमरज्जुने बांधले गेले आहेत, पम्प ( भय ) केळीस, पाण्याचे थेंब (अश्रू) मेघाँतच दिसन येतात. त्या न्यायी शिवाजीची राजनीति ही अशा प्रकारची आहे. (२४७)