पान:संपूर्ण भूषण.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण -- - -- - - - - - = == == = = | ६२ पर्याय-लक्षण, दोहा एक अनेकन मैं रहै, एकहि में कि अनेक। ताहि कहत परयाय हैं, भूषन सुकवि विवेक ॥२४०॥ | एकांत अनेक व अनेकांत एक, असे वर्णन जेथे करण्यात येते तेथे ‘पर्याय' अलंकार होतो. (२४०) उदा०–दोहा जीत रही औरंग में, सवै छत्रपति छॉड़ि। तजि ताहू को अब रही, सिवसर जा कर माँड़ि ॥२४१॥ सर्वं छत्रपतींना ( राजना) सोडून विजय औरंगजेबासच मिळाला (सर्व राजति औरंगजेब विजयी झाला); पण त्या विजयाने औरंगजेबासहि सोडले व तो आत सरजा शिवाजीच्या हाताँत शोभू लागला. (२४१) उदा ० २ रें-कवित्त मनहरण | कोट गढ़ है कै माल मुलुक मैं बीजापुरी गोलकुंडा वारो पीछे ही को सरकतु है । भूषन भनत भौसिला भुवाल भुजबल रेवा ही के पार अवरंग हरकतु है ॥ पेसकसै भेजत इरान फिरगान पति उनहूके उर याकी धाक धरकतु है । साहितनै सिवाजी खुमान या जहान पर कौन पातसाह के न हिए खरकतु है ? ॥ २४२॥ । | कोट आणि गड देऊन विजापूरकर व गोवळकोंडेवाले ( संपत्ति व देश या बाबतींत ) मागे हटले. त्यांचे जवळ शिवाजीपेक्षा माल आणि मुलूख कमी राहिला. भूषण म्हणतो, भोंसलेराज ! तुझ्या बाहूबलाच्या भीतीने औरंगजेब रेवा नदीच्या पलीकडेच थबकून आहे. इराण आणि फिरंगीन ( यूरोप चे बादशहाँच्या उराँत शिवाजीची धास्ती बसल्यामुळे ते नजराणा पाठावतात. हे शहाजी पुत्र शिवाजी ! तुझ्या धाकानें या जगत कोणा बादशाहाची छाती धडधड फरणार नाहीं ? (२४२)