पान:संपूर्ण भूषण.djvu/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

------------------


--- '_r=== श्रीशिवराज-भूषण ब्रह्मदेवाने (नानाप्रकारच्या) जड जवची सर्वांरंभी रचना केली. त्यामुळे ( ब्रह्मदेवकृत ) रचना श्रेष्ठ आहे; त्या रचनेत जीव हा पदार्थ श्रेष्ठ आहे; कारण त्याचे ठिकाणीं ज्ञान ठेविले आहे. त्या जीवति, भूषण प्रतिज्ञेवर सांगतो की, मनुष्यजीव श्रेष्ठ आहे; मनुष्यलोकांत राजा श्रेष्ठ व सर्व राजति शिवाजी श्रेष्ठ आहे. (२३७) ६१ यथासंख्य-लक्षण, दोहा । क्रम स कहि तिनके अरथ, क्रम स बहुरि मिलाय । | यथासंख्य ताको कहैं, भूषन जे कविराय ॥ २३८ ।। प्रथमतः कहीं वस्तूंचे क्रमशः वर्णन करून त्याच क्रमानें त्याँजविषयीचे पुनरपि विवरण करण्यात येते तेथे ‘यथासंख्य अलंकार समजावा. (२३८) । उदा ०–कवित्त मनहरण जेई चहौ तेई गहौ सरजा सिवाजी देस संके दल दुवन के जे वे बड़े उर के। भूषन भनत भौसिला सो अब सनमुख कोऊ ना लरैया है धरैया धीर धुर के ॥ अफजल खान रुस्तुमैजमान, फत्तेखान, कूटे लूटे ए उजार बिजैपुर के। अमर सुजान मोहकम बहलोल खान खाँडे छॉडे डाँडे उमराव दिली सुर के ॥२३९॥ । सरजा शिवाजीस जे जे देश घेण्याची इच्छा झाली ते ते त्याने घेतले. ( त्यामुळे ) मोठमोठे हिम्मतवान् शबू ( त्याला ) भिऊ लागले. भूषण म्हणतो. ( इतच नव्हे) आत शिवाजीसमोर कोणी धैर्य धरून लढणारा असा राहिला नाहीं. अफजलखान, रुस्तुम जमा, फत्तेखान ह्या विजापुरच्या सरदारपैकीं, अफजलखानास मारले, रुस्तुमजमास लुटले आणि फतेखानाने शिवाजीशी तह केला. तसेच दिल्लीश्वर औरंगजेबाचे सरदार अमरसिंह, गुजानसिंह यस मारलें, मोहकमसिंहास सोडून दिले आणि बहलोलखानाडून देड घेतला. (२३९)