पान:संपूर्ण भूषण.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ श्रीशिवराज-भूषण दुसरे उदा०-कवित्त मनहरण कसत मैं बार बार वैसोई बुलन्द होत वैसोई सरस रूप समर भरत है । भूषन भनत महराज सिवराज मनि, सघन सदाई जस फूलन धरत है ॥ बरछी कृपान गोली तीर केते मान, जोरावर गोला बान तिनहू को निदरत है। तेरो करबाल भयो जगत को ढाल, अब सोई हाल म्लेच्छन के काल का करत है ॥ २२९ ॥ भूषण म्हणतो, हे राजश्रेष्ट शिवाजी महाराज ! सदाफुलीची फुलें वरचेवर तोडली असताना तिला जशी अधिकच दाट फुले येऊ लागतात,ततच तुझी तरवार समरगणांत (बुलन्द) उन्नत होऊ लागली की, सरसरूप धारण करू लागते (रक्ताने माखते); किंवा तुझी तरवार समरांगणात वावरू लागली की, सरस होते (रक्तपान करते) व तिला नेहमी यशरूप फुले येऊ लाग. तात. तुझ्या तरवारीसमोर इतरांच्या बरच्या, तरवारी, गोळ्या (बंदुकीच्या), तीर, तोफेचे जोरदार गोळे आणि बाण यांची काय बिशाद ? तीच तुझी तरवार जगताला ढाल स्वरूप ( संरक्षणकत ) आहे; पण साम्प्रत यवनचा काळ करणारी झाली आहे. (२२९) । ५८ (कारण-माला) गुंफ-लक्षण, दोहा पूरब पूरब हतु कै, उत्तर उत्तर हेतु ।। या विधि धारा बरनिए गुम्फ कहावत नेतु ॥ २३० ॥ एकाद्या कारणापासून जेथे कार्य उत्पन्न होते व तेच कार्य पुन्हा दुस-या कार्याचे कारण बनते; आणि अशाच कार्य-कारणांची परंपरा जेथे वर्णन करण्यत येत तेथे कारण -माला' किंवा 'गुम्फ’ अलंकार समजला जातो. (२३०)

  • सदाई-सदाफुली किंवा दुपारीचे झाड. ज्याला नेहम फुले लागतात तें.

शि. भू.... ६