पान:संपूर्ण भूषण.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शवराज-भूषण मुगलौ पठान फरकत परे फर मैं॥ भूषन भनत भौसिला के भट उद्भट जीति घर आए धाक फैली घर घर मैं । मारु के करैया अरि अमर पुरै गे तऊ अजौं मारु मारु सोर होत है समर मैं ॥ २२६ ॥ शिवाजीने सालेरीच्या लढाईत हातीं तरवार धरून दिल्लीपतीच्या सैन्याची कत्तल केली; चन्दावत, कछवाहे इत्यादि बलाढ्य व प्रशंसनीय वीरांचा फडशा पाडला; मोगल पठाण मैदानावर फरफटत पडले. भूषण म्हणतो, भोंसल्याचे शूरवीर योद्धे युद्ध जिंकून घरी आले, पण त्यांचा दरारा मात्र घरोघर बसला. मारा करणारे शबू मरण पावले, तरी पण रणांगणावर अद्याप ‘मारा मारा' असा ध्वनि निघत आहे. (२२६) | ५७ व्याघात-लक्षण, दोहा और काज करता जहाँ, करै औरई काज । ताहि कहत व्याघात हैं, भूषन कवि सिरताज ॥ २२७ ॥ एक कार्य करीत असताँ दुसरेच केले जाते, असे वर्णन करण्यात येते तेथे ‘व्याघात' अलंकार होतो. (२२७) उदा०-मालती सवैया ब्रम्ह रचै पुरुषोत्तम पोसत संकर सृष्टि सँरन हारे । तू हरि को अवतार सिवा नृप काज सँवारे सबै हरि वारे ॥ भूषन यो अवनी यवनी कहैं * कोऊ कहै सरजा स हहारे । तु सबको प्रतिपालनहार बिचारे भतार न मारु हमारे ॥२८॥ ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतो, पुरुषोत्तम (विष्णु) तिचे पोषण करितो आणि शंकर संहार करितो. हे शिवराज ! तुं हरीचा अवतार असून सर्व हरीचीच कामें त्व। संभाळिली आहेस ( सृष्टीचे भरण पोषण करितोस.) भूषण म्हणतो (म्हणून), पृथ्वीवरील यव स्त्रिया म्हणतात की, कोणी तरी सरजा शिवाजीस जाऊन सांगा की, ते सर्वांचा प्रतिपाल करणारा आहेस; गरीब बापडे आमचे भ्रतार मारू नकोस. (२२८)