पान:संपूर्ण भूषण.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज भूषण ७८ आधारापेक्षा अधेयाचे वर्णन जेथे अधिक केले जाते तेथे अधिक ‘अलंकार जाणावा. (२१९) उदा०–दोहा सिव सरजा तव हाथ को, नहि बखान करि जात । जाको बासी सुजस सय, त्रिभुवन मैं न समात ॥ २२०॥ हे सर्जा शिवाजी ! तुझ्या हाताचे वर्णन करता येत नाहीं. ( कारण, ) त्या हातति वास्तव्य करणारे तुझे सुयश त्रिभुवनत मावेनासे झालें। आहे. (२२०) उदा० २ २–कवित्त मनहरण सहज सलील सील जलद से नील डील पब्बय से पील देत नाहि अकुलात है। भूषन भनत महाराज सिवराज देत कंचन को ढेरु जो सुमेरु सो लखात है॥ सरजा सवाई कासी करि कविताई तव हाथ की बड़ाई को बखान करि जात है ? जाको जस टंक सातो पि नव खंड महिमंडल की कहा ब्रहमंड ना समात है ॥ २२१ ॥ भूषण म्हणतो; शिवाजी महाराज पाण्याने भरलेल्या नीलवर्ण मेधासारखे व पर्वताप्रमाणे धिप्पाड असे हत्ती देतांना घाबरत नाहीत. सोन्याचे जे ढोग शिवाजी दान करितो ते मेरु पर्वताप्रमाणे दिसतात. हे सवाई सर्ज! तुझे कवित्व ( गुणगान ) कोण घरू शकेल ? नुसत्या तुझ्या दोन हाताची प्रशंसा कोणी करू शकणार नाही. तुझे वालभर ( यत्किंचित् ) यश भूतलावरील साती द्वीपति, नऊहि खंडीत, इतकेच काय पण अह्मांडतिदेखील मावेनासे झाले आहे. (२२१) ५५ अन्योन्य-लक्षण, दोहा अन्योन्य उपकार जहूँ, यह बरनन ठहराय ।। ताहि अन्योन्या कहते हैं, अलंकार कविराय ॥ २२२ ॥