पान:संपूर्ण भूषण.djvu/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण | ५३ विषादन-लक्षण, दोहा जहँ चित चाहे काज ते, उपजत काज विरुद्ध। ताहि विषादन कहत हैं, भूषन बुद्धि विसुद्ध ॥ २१६॥ इच्छित कार्यांच्या विरुद्ध कार्योप्तात्त जेथे होते तेथे ‘विषादन' अलंकार होतो. (२१६) उदा०—मालती सवैया दारहि दारि मुरादहि मारि कै संगर साह सुजै बिचलायौ । कै कर मैं सब दिल्ली की दौलत औरहु देस घनै अपनायो । बैर कियो सरजा सिव स यह नौग के न भयो मन भायो । फौज पठाई हुती गढ़ लेन को गाँठहुँ के गढ़ कोट गॅवायो ॥२१७ ॥ ( औरंगजेबाने आपले भाऊ) दारा, मुरादबक्ष यांना मारून व शहासुजाला युद्धात जिंकून सर्व दिल्लीची दौलत हस्तगत करून घेतली आणि दुसरेहि पुष्कळसे देश जिंकले (व निष्कंटकपणे राज्य करू लागला ); पण सर्जा शिवाजीशी वैर उत्पन्न झाले हे मात्र औरंगजेबाला आवडलें नाहीं. किल्ले हस्तगत धरण्याकरिता म्हणून फौज पाठविली. तो किल्ले जिंकून घेणे एकीकडेच राहून, ती आपलेच किल्ले गमावून बसली! (२१७) उदा० २ रें-दोहा महाराज सिवराज तव, बैरी ताजे रस रुद्र ।। बचिबे को सागर तिरे, बूडे सोक समुद्र ॥ २१८ ॥ हे शिवाजी महाराज ! तुमचे शत्रू आपल्या बचावाकरितां वीरभाव सोडून समुद्रापार झाले; पण पुढे शोष-समुद्गत बुडाले ! (२१८) | ५४ अधिक-लक्षण, दोहा जहाँ बड़े आधार त, बरनत बढ़ि आधेय । ताहि अधिक भूषन कहत, जानि सुग्रन्थ प्रमेय ॥ २१९ ॥