पान:संपूर्ण भूषण.djvu/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ श्रीशिवराज-भूषण एकादं कार्य करीत असतां दुसरेच करण्यात येते तेथेहि ‘असंगति अलंकार होतो. (२०३) । उदा ०–मालती सवैया साहि तनै सरजा सिव के गुन नेकहु भाषि सक्यो न प्रबनो । उद्यत होत कछ करिबे को करै कछु वीर महारस भीना ।। ह्याँ ते गयो चकतै सुख देन को गोसलखाने गयो दुग्छ दीनो । जाय दिली दरगाह सुसाह को भूषन बैरि बनाय ही लीनो ॥ २०४॥ शहाजी पुत्र शिवाजीच्या एकाद्या गुणाचे वर्णन निपुण कवि देखील करू शकणार नाही. वीररसाने भरलेला तो शिवराज एकादें काम करण्यास प्रवृत्त होतो; पण ते ( हातातील काम ) सोडून, करतो भलतेच. येथून औरंगजेबास रख देण्याकरिता म्हणून गेला व तेथे स्नान-गृहाश जाऊन त्यास त्रास दिला. भूषण म्हणतो, दिल्ली दरबारात जाऊन त्या बादशहाला ( औरंगजेबाला ) ह्याने ( शिवाजीनें ) शेवटी आपला शत्रू केला. (२०४) । ४९ विषम-लक्षण, दोहा कहाँ बात यह कहँ वहै, य जहँ करत बखान । तहाँ विषम भूषन कहत, भूषन सुकवि सुजान ॥२५॥ ‘कुठे हे आणि छुळे तें' असे वर्णन जेथे करण्यात येते तेथे 'विषम अलंकार जाणावा. (२०५)

  • उदा०-मालती सवैया जावलि बार सिंगारपुरी औ जवारि को राम के नैरि को गाजी । भूषन भौसिला भूपति ते सब दुरि किए करि कीरति ताजी ॥ वैर कियो सिवजी सो खवास खाँ डौंडियै सैन बिजैपुर बाजी । बापुरो एदिल साहि कहाँ कहाँ दिल्ली को दामनगीर सिवाजी ? ॥२०६॥