पान:संपूर्ण भूषण.djvu/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नारायण २

-=-=--

1 ।। असंगति (द्वितीय)-लक्षण, दोहा आन ठौर करनीय सो, करे और ही ठौर॥ । ताहि असंगति और कवि, भूषन कहत सगौर ॥२०१॥ एकाद्या ठिकाणीं कर्तव्य असलेले काम भलत्याच ठिकाणी ( दुस-या कोठे ) ६.ले असे वर्णन जेथे केले जाते, तेथे हि असंगति' हो । अलंकार होतो. (२०१) उदा०—मनहरण दंडक भूपति सिवाजी तेरी धाक सो सिपाहिन के राजा पातसाहिन के मन ते अहं गली। भौसिला अभंग तू तो जुरतो जहॉई जंग तेरी एक फते होत मानो सदा संग ली ॥ साहि के सपुत पुहुमी के परहूत कवि भूषन भनत तेरी खरगउ दंगली । सञ्जुन की सुकुमारी थहरानी सुन्दर औ सत्रु के अगारन मैं राखे जंतु जंगली ॥२०२ । । हे शिवाजी भूपाल ! तुझ्या धाकाने शिपाई, राजे आणि बादशहा यांचा अहंकार पार गळून गेला. हे भोसलेराजा ! तू तर नेहमी अभंगच आहेस. जेथे जेथे म्हणून युद्ध जुपले जाते तेथे तेथे तुला यश हें ठेविलेलेच असते. जण काय, यश हे नेहमी जवळच बाळगलेले आहे. कवि भूषण म्हणतो, हे शहाजी सुपुत्र ! तुम्ही पृथ्वीवरील इंद हाँ, तुमची तरबार मुळीं विजयी ( पेज जिंकणारी, ) आहे. ह्या तुमच्या तरवारीस पाहून शत्रूच्या सुकुमार व सुंदर स्त्रिया थरथर कापतात. तुम्ही (ह्या तरवारीचे जोरावरच) शत्रूच्या (भव्य) वाड्यातून रानटी श्वापदें ठेविली ( अर्थात् शत्रूचे वाडे ओसाड पडले ). (२०२) असंगति ( तृतीय)-लक्षण, दोहा करन लगै औरै कछु, करे औरई काज ।। तही असंगति होत है, कहि भूषन कविराज ॥ २०३॥ ---