पान:संपूर्ण भूषण.djvu/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन جسی جی جیسی سیاسی الطبيعية ، بسی های بی بی سی به میان من م یلی سی جی ایم سی بی بی بی بی بی بی بی سی دی های سیمبیا بی بی سی سی سی ا ادبی ه अमृतध्वनि, मालतीसवैया या वृत्तीचा प्रामुख्याने उपयोग केला आहे. हैं काव्य राज्याभिषेकानंतर सुमारे पंधरा दिवसात तयार झाले असे कवीने स्वतःच दिलेल्या ग्रंथसमाप्तिकालावरून दिसून येते. ( दोहा ३८०, पृष्ठ १३४ ) मिश्र प्रतीतील ह्या रचनाकालाच्या दोह्यांत पाठभेद*असन यांच्या मतें कवीनें महिना लिहिला नाही; पण मुंबई प्रतींत व त्रिपाठी प्रतींत या बाबतींत साम्य दिसून येते. त्रिपाठीजींनी ह्या दोह्याचा अर्थ देतांना ‘सुचि ददि तेरास भान' ह्याचा अर्थ आषाढ वद्य १३ रविवार, असा केला आहे. शिवचरित्र प्रदीपतX श्री० दिवेकर यांनी अनेक साधनांनी हा समाप्तिकाल ज्येष्ठ वद्य १३ रविवार, म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे राज्याभिषेकानंतर बरोबर १५ दिवस ठरविला आहे व हा बरोबर असल्याचे श्री० गोवेिंद्ररावजी सरदेसाई यांनी Shivaji Sounenirमध्ये आपल्या निवेदनात कबूल केले आहे. | या ग्रंथाचा प्रारंभकालहि विवादित आहे. कोणी म्हणतात, भूषण शिवराजाचे दरबारी आल्यापासून म्हणजे सन् १६६७ पासून हे काव्य रचण्यास सुरवात केली असावी व राज्याभिषेकानंतर समाप्त केले असावे. तर कोणी म्हणतात; भूपणासारख्या प्रतिभासम्पन्न कवीला महिना-पंधरा दिवसांत एवढे काव्य रचणे अशक्य नाहीं, सबब राज्याभिषेकापूर्वी महिना-पंधरा दिवस सुरू करून पुढे पंधरा दिवसांत संपविले असावे. असो. मुंबई प्रतींत शिवराज-भूषणाची संख्या २७ दिली आहे. तींत अलंकारसूचीचे १८ छंद धरिले आहेत. मिश्रप्रतीत व* त्रिपाठीमतींत हेच ९ आहेत. हे छेद ९ च समजल्यास मुंबई प्रतीची संख्या ३१८ होते. मिश्न व त्रिपाठी प्रतींतील छंदसंख्या ३८२ आहे. अर्थात् मुंबई प्रतीपेक्षा ६४ छंद मिश्र व त्रिपाठी प्रतीत अधिक आहेत. ह्या ६४ पैकीं, छंद ३६, ४३, ४५, ४७, १२७, १७९, १८८, १९४, २०१, २०३, २९८ हे अकरा छंद अलंकार लक्षणाचे आहेत. ते अलंकार हे- लुप्तोपमा ३६

  • पाठभेद पृष्ठ १३४ वर दिला आहे. शिवचरित्र प्रदीप, पष्ठ ३०५।३०६.