पान:संपूर्ण भूषण.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन कडील हस्तलिखित प्रतीचा शुद्धतेच्या दृष्टीने अधिक उपयोग झाला व सर्वांत अधिक छंद कवि गोविंद गिल्लाभाई यांच्या संग्रहाँतील हस्तलिखित प्रतीत मिळाले. हे त्यांनी आपल्या प्रस्तावनेत दाखवले आहे. श्री० त्रिपाठीजींनी मिश्र-बन्धूचा हा संशोधित पाठ अधिक शुद्ध मानून थोड्या बहुत फरकानें आपली प्रत तयार केली. हिन्दी-साहित्यात ह्या दोन्ही प्रती अधिक प्रमाणभूत मानल्या जातात म्हणून मी याचाच अवलंब केला आहे. मिश्र व त्रिपाठी प्रतींतील शिवराज-भूषणाचा अनुक्रम सारखा आहे; पण शिवा-बावनी, छत्रसाल-दशक व फुटकर (स्फुट) यांतील अनुक्रम च छंद संख्या र्यात बरेच अंतर आहे. त्याचा विचार त्या त्या सदरात पुढे करण्यात येईल. शिवराज-भूषण सिव चरित्र लाख य भयो कवि भूषन के चित्त । भाँति भाँति भूषणनि सो, भूषित करौं कवित्त ॥२९॥ -शिवराज-भूषण, हे शिवराजासंबंधीं कवि-भूषणाचे मुख्य काव्य. यात कवीने चांगले चांगले ग्रंथ पाहून व आपल्या मताप्रमाणे एकशे पांच अलंकारांनी आपण शिवरायाचे वर्णन केले असे सर्व अलंकारांची सूचि स्वतः देऊन म्हटलें आहे युत चित्र संकर एकसत भूषन कहे अरू पाँच ।। लखि चारु ग्रंथन निज मतोयुत सुकवि मानहु सँच ॥ पृष्ठ १३३ । १३४, दोहा ३७१ ते ३७९. प्रथम दोहा वृत्तांत अलंकार-लक्षण देऊन त्याच्या उदाहरणीतून शिवचरित्राचे कवीने रसभरित वर्णन केले आहे. एकेका लक्षणाचे उदाहरण प्रायः एकेदा छत केले आहे. क्वचित् दोनदोन तीनतीन चारचार छंदचाहि उपयोग केला आहे. उदाहरणाकरित मनहरण, हरिगीतिका,