पान:संपूर्ण भूषण.djvu/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण - जेथे विरोधाची नुसती जाणीव होते, वस्तुतः विरोध असत नाही, तेथे *विरोधाभास अलंकार म्हणतात. (१८३) उदा०-- मालती सवैया दृच्छिन नायक एक तुही, भुव भामिनि को अनुकूल व्है भावै ।। दीनदयाल न तो सो दुनी पर म्लेच्छ के दीनहिं मारि मिटावै ॥ श्री सिवराज भनै कवि भूषन तेरे सरूप को कोउ न पावै ।। सूर सुबंस मैं सूर सिरोमनि व्है करि तू कुलचन्द कहावै ॥१८४॥ | हे दक्षिणनाथ ! एकपत्नीव्रती तूच ह्या पृथ्वीरूप वधूला आवडतोस. जगत तुझ्यासारखा दीनदयाल कोणी नाहीं;पण म्लेच्छौना मारून त्याचा जों दीन (धर्म) त्यास मात्र ते नष्ट केलास. मूषण म्हणतो, हे श्रीशिवराय ! तुझ्या स्वरूपाची बरोबरी कोणी करू शकत नाहीं. तू उत्तम सूर्यकुलात शूरशिरोमणि होऊनहि (रघु) कुलचंदचे म्हणवितोस. (१८४) ४५ विभावना-लक्षण, दोहा । भयो काज बिन हेतुही, बरनत हैं जेहि और। तहँ विभावना होत है, कवि भूषन सिरमौर ॥ १८५ ॥ कारणावाचून होणा-या कार्याचे जेथे वर्णन केले जाते, तेथे ‘विभावना अलंकार होतो. (१८५) उदा०—मालती सवैया बीर बड़े बड़े मीर पटान खरो रजपूतन को गन भारो। भूषन आय तहाँ सिवराज लयो हरि औरंगजेब को गारो ॥ दीन्हो कुज्वाय दिलीपति को अरु कीन्ह वजीरन को मुंह कारो। नायो न माथहि दक्खिननाथ न साथ मैं फौज न हाथ हथ्यारो ॥ / भूषण म्हणतो, मोठमोठ्या शूरवीर पठाण आणि रजपूत सरदारांच्या मुंडी उभ्या असत तेथे शिवरायाने येऊन औरंगजेबाचा गर्व हरण केला; दिल्लीपतीला दुरुत्तरे करून वजिरांची तोंडे काळी ठिक्कर पाडली; आणि