पान:संपूर्ण भूषण.djvu/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ६५ नव्हे, तर पोर्तगाल ( सारखा दूरचा) देश जिंकण्याकरित समुद्र उतरून जाऊ. सर्जा शिवाजीशी लढण्याकरिता आम्हाला पाठवतो. आम्ही बोलून चालून आपले नौकर, काही तरी निमित्त करून आम्ही टाळाटाळी करितों असेहि नाहीं; किंवा मरणाला आम्ही भितों असेहि नाहीं. पण हजरत! कहीं दिवस आम्ही जगलों असत तर आम्हाला पुष्कळ कामे करत आलीं असती. (१८०) ४३ विरोध (द्वितीय विषम)--लक्षण, दोहा द्रव्य क्रिया गुन में जहाँ, उपजत काज विरोध। ताको कहत विरोध हैं, भूषन सुकवि सुबोध ॥ १८१ ॥ द्रव्य, क्रिया आणि गुण ह्यात जेथे साम्य दिसून येत नाहीं, विरोध असतो, तेथे ‘विरोध'अलंकार जाणावा. (१८१) उदा०-मालती सवैया श्री सरजा सिव तो जस सेत स होत हैं बैरल के मुँह कारे । भूषन तेरे अरुन्न प्रताप सर्पद लखे कुनबा नृप सारे ॥ साहितनै तव कोप कृसानु ते बैरि गरे सब पानिप वारे । एक अचम्भव होत बड़ो तिन ओठ गहे अरि जात न जारे ॥१८॥ | हे सर्जा शिवाजी ! तुझ्या शुभ्र व निष्कलंक यशाने शत्रूचीं तोंढे काळी होतात. भूषण म्हणतो, तुझ्या प्रतापरूप अरुणाने (लालप्रभेने) सर्व नृपसमुदाय पढिराफेक (निस्तेज) दिसत आहे. हे शहाजी पुत्रा ! तुझ्या क्रोधाग्नीपुढे सर्व तेजस्वी शत्रू निस्तेज झाले; पण मोठे आश्चर्य हे की, दुती तृण धरणारे शत्रू तुझ्या क्रोधाग्निीने जळत नाहींत ! (१८२) ४४ विरोधाभास–लक्षण, दोहा जहाँ विरोध सो जानिए, सॉच विरोध न होय । तहाँ विरोधाभास कहि, बरनत हैं सबकोय ॥ १८३॥ शि. ५....५