पान:संपूर्ण भूषण.djvu/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज भूषण =--=-=---=------------- उदा०—-मालती सवैया । जाय भिरौ न भिरे बचिहौ भनि भूषन भौसिला भूप सिवा स । जाय दर्शन दुरौ दरिऔ तजि के दरियाव लँघो लघुता सो ॥ सीछन काज वजीरन को कदै बोल य एदिल साहि सभा सो। छूटि गयो तो गयो परजालो सलाह की राह गहौ सरजा स॥ १७८ ॥ भूषण म्हणतो, आदिलशहाने आपल्या दरबाराँत वजिरांना उद्देशून असे उद्गार काढले की, तुम्ही राजा शिवाजी भोसल्याशी जाऊन लढा; पण नको, लढाल तर वाचणार नाहीं; दुन्याखो-यातून लपून बसणेच बरे; पण दु-याखो-या सोडून गरिबीने समुद्रपार होणेच चांगले. पन्हाळगड हातचा गेला तरी बेहेत्तर, पण त्या सर्जाशी संधीच करा. (१७८) ‘आक्षेपाचे दुसरे लक्षण-दोहा जेहि निषेध अभ्यास ही, भनि भूपन सो और। कहत सकल अच्छेप हैं, जे कविकुल सिरमौर ॥ १७९ ।।। अगोदर एकाद्या वस्तूचा निषेध करून पुन्हा अन्य प्रकाराने तिलाच स्थापन करणे यालाही आक्षेप अलंकार' म्हणतात. (१७२) उदा०–कवित्त मनहरण । पूरब के उत्तर के प्रबल पछाँह हू के सब बादसाहन के गढ़ कोट हरते । भूपन कहैं यो अवरंग सों वजीर जीति लीबे को पुरतगाल सागर उतरते ॥ सरजा सिवा पर पठावत मुहीम काज हजरत हम मरिबे को नाहिं डरते । चाकर है उजुर कियो न जाय नेक पै कछ दिन उबरते तो घने काज करते ॥ १८० ॥ भूषण म्हणतो, औरंगजेबास त्याचे वजीर म्हणतात, आम्ही पूर्व, उत्तर आणि पश्चिमेकडील सर्व बादशहाँचे किल्ले हस्तगत करून घेऊ; इतकेच