पान:संपूर्ण भूषण.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ श्रीशिवराज-भूषण दानशूर म्हणवून घेता ते कशामुळे ? आमच्याकडून सुवर्ण पारखून घेतचांगल्या चांगल्या कविता म्हणवून घेत-तेव्हाँ कुठे पिवळे होन देत. * तुम्ही राजे असुन लाख ( रुपये) देण्याची सज्जता दाखवित तर लोक एका क्षणत झाडपासून ( कितीतरी ) लाख काढून घेतात. संतुष्ट होऊन आम्हांस हाथी ( हत्ती ) एक तुम्हीच देतो असे नाही तर कोणीही खुशीत येऊन हंसून आम्हांस हाथी ( टाळी ) देतात. (१७५) । तू तो रात दिन जग जागत रहत वेऊ जागत रहत रातो दिन बन रत हैं। भूषन भनत तू विराजे रज भरो वेऊ रज भरे देहिन दरी में विचरत हैं ॥ तू तो सूरगन को विदारि विहरत सूर मंडलै विदारि वेऊ सुर लोक रत हैं। काहे ते सिवाजी गाजी तेरोई सुजस होत तोस अरिवर सरिवर सी करत हैं ॥ १७६ ॥ भूषण म्हणतो, हे धर्मवीर शिवाजी ! तूही रात्रंदिवस आपल्या ( प्रासादाँत ) जागत राहातोस तर तिकडे ते देखील ( शत्रू) रानावनात फिरून रात्री आणि दिवस जागून काढतात. तू राजश्रीने शोभतोस तर ते देखील रजश्री ( धुळीने )ने भरलेल्या शरीरनि दु-याखो-यातून फिरताहेत. तू शूरच्या समुदायाचे विदारण करीत फिरतोस, तर ते देखील सूर्यमंडलाचा भेद करून देवलोकति रमत आहेत. अशा प्रकारे तुझे शत्रू तुझ्याशी आपली तुलना करीत आहेत; तरी तुझीच कीर्ति का होते समजत नाहीं. ४२ आक्षेप-लक्षण, दोहा पहिले कहिये बात कछु, पुनि ताको प्रतिषेध। ताहि कहत अच्छेप है, भूषन सुकवि सुमेध ॥ १७७॥ अगोदर एकाद्या वस्तूचे वर्णन करून पुन्हा तिजविषयीं जेथे निषेध प्रकट केला जातो, तेथे ‘आक्षेप' अलंकार होतो. (१७७)