पान:संपूर्ण भूषण.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शान्धराज ६० | उदाहरण दुसरें देखत सरूप को सिहात न मिलन काज जग जीतिबे की जामे राति छल बल की । जाके पास आवै ताहि निधन करत वेगि भूषन भनत जाकी संगति न फल की ॥ कोरात कामिनी राच्यो सरजा सिवा की एक बस कै सकै न बस करनी सकल की । चंचल सरस एक काहू पै न रहै दारी गनिका समान सुबेदारी दिली दल की ॥ १६७ ॥ (वेश्येचे बाह्य ) स्वरूप पाहून कोणाला तिला आलिंगन देण्याची इच्छा होत नाहीं ? कपटाचे बलावर जग जिंकणे हा तिचा ( वेश्येचा ) व्यवसायच आहे. ती ज्या जवळ जाते त्यास तत्काल निर्धन करून सोडते. भूषण म्हणतो, तिची संगत फलदायी नाही. पण शिवाजीवर अनुरक्त असलेली कीर्तिरूप कामिनी मात्र एकट्या शिवाजीच्याच फह्यांत आहे. सर्वांना ती वश करू शकत नाही. (वेश्या) चंचल असल्यामुळे जशी एका जवळ राहत नाहीं, तशी दिल्ली-दुलाची सुभेदारी ही कोणा एकाच्या घराँत राहिली नाही. (१६७) ३९ अप्रस्तुति प्रशंसा–लक्षण, दोहा प्रस्तुति लीन्हे होत जहँ, अप्रस्तुति परसंस।। अप्रस्तुति परसंस सो कहत सुकवि अवतंस ॥ १६८ ॥ एकाद्या वस्तूचे वर्णन स्पष्ट शब्दांनीं न करित मूळ वस्तुज्ञान होईल अशा अन्य रीतीने करण्यत येते तेथे अप्रस्तुत प्रशंसा' अलंकार होतो.(१६८) उदा०-दोहा | हिन्दुनि सो तुरकिनि कहैं, तुम्हें सदा सन्तोष। नाहिन तुम्हरे पतिन पर, सिव सरजा कर रोष ॥ १६९ ॥ यवन स्त्रिया हिन्दु-स्त्रियांना म्हणतात, बायनों ! तुम्ही नेहमीं संतुष्ट असतो; (का असणार नाही ? कारण,) तुमच्या नव-यांवर सरजा शिवाजी। रोष (कधींच) होत नाही. (१६९)