पान:संपूर्ण भूषण.djvu/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषणः

-



-




|३८ श्लेष-लक्षण, दोहा एक वचन मैं होत जहँ बहु अर्थन को ज्ञान। स्लेस कहते हैं ताहि को भूषन सुकवि सुजान ॥ १६५ ।। एका शब्दाने जेथे अनेक अर्थाचे ज्ञान होते, तेथे ‘श्लेषालंकार” होतो. (१६५) [ पुढील छंद श्रीराम व शिवाजी ह्या उभयतस लागू होतो.] | उदा०–कवित्त मनहरण सीता संग सोभित सुलच्छन सहाय जाके भूपर भरत नाम भाई नीति चारु है । भूषन भनत कुल सूर कुल भूषन हैं दासरथी सब जाके भुज भुव भारु है ॥ अरि लंक तोर जोर जाके संग बानर हैं लिधुर हैं बॉधे जाके दल को न पारु है। तेगहि कै भेटै जौन राकस मर जाने सरजा सिवाजी राम ही को अवतारु है ॥ १६६॥ भूषण म्हणतो, सीता आणि लक्ष्मण ज्याचे बरोबर शोभत आहेत, भरत नावाचा ज्याचा सहाय्यकारी भाऊ आहे, व जो सम्पन्न, सुर्यकुलभूषण दशरथाचा पुत्र असून ज्याच्या बाहंवर सर्व पृथ्वीचा भार आहे, ज्याने रावणाची लंका नष्टभ्रष्ट केली, ज्याच्याजवळ वानर सैन्य असून ज्याने सेतुबन्धन केले, ज्याच्या दळाचा पार लागत नाहीं है जो राक्षसचे मर्दन करणेच जाणतो, अशा त्या श्रीरामाचा शिवाजी हा अवतार आहे. भूतलावर जो लक्ष्मीने (संपत्तीने) शोभित आहे व ज्याचे सद्गुण त्यास सहाय असून त्याची कीर्ति वाढवितात व ज्यास नीति अतिशय आवडते (जो नातिसम्पन्न आहे); भूषण म्हणतो, जो सुर्यकुलास भूषण असून मोठमोठे बलाढय योद्धे ज्याचे दास आहेत, व सर्व पृथ्वीचा भार ज्याचे बाहूवर आहे, जो शत्रूची कंबर मोडणारा (पराभव करणारा), ज्याचें बल बरोबर असणा-या बाणत आहे, ज्याच्या सैन्याची गणती नाहीं, जो मनुष्यजातीच्या शत्रूस तरवारीने भेटतो (मारतो); असा तो शिवाजी रामाचा अवतार आहे. (१६६)