पान:संपूर्ण भूषण.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन

=

== ===== ",na anite

=

==="4" ,"tion 11 hrs - , " '"-"-.. =

==

महाराष्ट्रति ह्या आवृत्त्यांचा तादृश उपयोग झाला नाही असे म्हटल्यास चावगे होणार नाहीं. भूषणाचा काही थोडा परिचय महाराष्ट्रीय इतिहासभक्तांना व काव्यप्रेमी रसिकांना काव्येतिहाससंग्रहातून प्रसिद्ध झालेल्या ‘शिवराज-भूषणामुळेच राहिला आहे. यानंतर काही थोडे लेख* वगळले असता महाराष्ट्रति भूषणाच्या काव्यासंबंधीं कहीं चर्चा झाली नाही असे म्हटल्यास अत्युक्ति होणार नाही. प्रस्तुत अनुवादकत्याचे शिवा-बावनीचे मराठी सरळ भापतिर प्रसिद्ध झाल्यानंतर श्री० तिवारी यांचा मंदारमाला वृत्तीतील शिवा-बावनीचा अनुवाद ‘शिवप्रताप' नावाने विचरित्रासह एप्रिल १९२८ मध्ये प्रसिद्ध झाला. उत्तर हिंदुस्थानात प्रथम संवत् १९५० म्हणजे ३६ वर्षांपूर्वी ‘शिवराजभूषण' मूळ काव्य नवलकिशोर प्रेसमधून श्री० परमानन्दजी सुहाने यौनीं प्रसिद्ध केले. यानंतर कलकत्ता येथील वंगवासी-भूषण ग्रन्थावली, बाराबंकी येथील शिवराज-भूषण ही प्रसिद्ध झाली व अलीकडे या दहाबारा वर्षांत फाशी नागरी प्रचारिणी सभेतर्फे विख्यात मिश्रबन्ध सम्पादित एक व हिन्दी साहित्यसम्मेलन प्रयागतर्फे श्री० रामनरेशजी त्रिपाठी यांनी एक अशा दोन भूषण-ग्रंथावल्या आपापल्यापरीने प्रसिद्ध केल्या. ह्या दोन्ही ग्रंथावल्यांच्या तीन तीन आवृत्त्या खपून गेल्या. मिश्रबन्धून आपली प्रत प्रसिद्ध करण्यापूर्वी पूर्वप्रसिद्ध व अप्रसिद्ध सर्व भूषण-वाङ्मय एकत्रित केले होते व युगल किशोर मिश्र यांच्या

  • श्री० तिवारी यांचा महाराष्ट्र-साहित्य मासिकांतील ‘कवि-भूषण' शीर्षक लेख, मे १९२२.

वंगवासी भूषण ग्रंथावली. २ शिव-भूषण, नवलकिशोर. ३ पुण्याची प्रत ( काव्ये. संग्रहाची ). ४५ मुंबई प्रत कल्पतरु प्रेस व निर्णयसागर प्रेस. ६ बाराबंकी येथील शिव-भूषण प्रत. ७ युगल किशोर मिश्र यजिकडील हस्तलिखित प्रत ८ कवि गोविंद गिल्लाभाई काठेवाड यांजकडील हस्तलिखित.