पान:संपूर्ण भूषण.djvu/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। गा शिवराज-भूषण माहिं खलभल डारत है रीझे ते पलक माहिं कीन्हे रंक राय है। जंग जुरि अरिन के अंग को अनंग कीबो दोबो सिव साहिब को सहज सुभाय है ॥ १६२ ॥ शिवाजीचे औदार्य असे आहे की, त्याच्या आश्रयास राहणारे कुबेरा सारखे (धनकनकसम्पन्न) दिसतात. भूषण म्हणतो, त्या (शिवाजी)ला पाहतच भूक हरपते; व दारिद्य आणि दुःख ही आपोआप लयास जातात. शिवाजी कोपला असताँ सा-या जगत खळबळ उडवून देतो व प्रसन्न झाला असता एका क्षणन रंकाचा राव करितो. समरणित शत्रूना (अनंग करणे) मारणे, व (जीव) दान देणे हा त्या शिवाजीचा सहज स्वभाव आहे. (१६२) । उदा० २ रें-दोहा । सूर सिरोमनि स्रूर कुल सिव सरजा मकरंद ।। भूषन क्या औरंग जितै कुल मलिच्छ कुल चंद ॥१६३॥ शूरश्रेष्ठ सरजा शिवाजी सूर्यकुलाचा मकरन्द आहे. भूषण म्हणतो, मग त्याला (सूर्य-धुलोत्पन्न शिवाजीला) हा म्लेंच्छकुल-चंद्र औरंगजेब कसा जिंकू शकेल ? (१६३) उदा०-परिकरांकुराचे, दोहा भूषन भनि सब ही तबहि, जीत्यो हो जुरि जंग । क्यों जीतै सिवराज सौ अब अंधक अवरंग ॥ १६४ ॥ भूषण म्हणतो, (मागे) युद्ध जुपल्या वेळी सर्वांना जिंक्षिले आहे; मग तो अवरंगरूप अंधक देत्य आत शिवरायास कसा जिंकील ? (शिवाजीनेंमहादेवाने तर मागेच सर्व देत्यांना जिकून टाकले. मग महादेवाने मारलेला हा औरंगजेबाच्या रूपाने असलेला अंधक दैत्य, शिवाजीस थोडाच जंकू शकणार आहे ? ) (१६४)