पान:संपूर्ण भूषण.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ श्रीशिवराज-भूषण == ३४ सहोक्ति–लक्षण, दोहा वस्तुन को भासत जहाँ, जन रंजन सह भाव। ताहि सहोक्ति बखानहिं, जे भूषन कविराव ॥१४९॥ एकाद्या वस्तूचा भाव जनमनरंजनासह जेथे प्रकट होतो तेथे ‘सहोक्ति अलंकार म्हणतात. (१४९) उदो ०–कांवत्त मनहरण छूट्यो है हुलास आम खास एक संग छुट्यो हरम सरम एक संग बिनु ढंग ही। नैनन ते नीर धीर छूट्यो एक संग छूट्यो सुख रुचि मुख रुचि त्यही बिन रंग ही ।। भूषन बखानै सिवराज मरदाने तेरी धाक बिललाने न गहत बल अंग ही । दक्खिन के सूबा पाय दिली के अमीर तजै उत्तर की आस जीव अस एक संग ही ॥ १५० ॥ बादशहाच्या दरबारातील आनंद आणि अन्तःपुरातील (स्त्रियांची) छज्जा एकदम नाहींशी झाली. नेत्रतून अश्रू व (हृदयांतून) धैर्य एकदम गळाले. तसेच सुखोपभोग आणि मुखफाँति एकदम फिकी पडली. भूषण म्हणतो, हे मर्द शिवाजी ! तुझ्या धाकाने सर्व आक्रोश करीत फिरत आहेत, अंगात शक्ति कशी ती रहात नाहीं. दिल्लीच्या अमिरस दक्षिणेची शुभेदारी मिळतच ते उत्तरेची (परत जाण्याची) व जीवाची दोन्ही आशा सोडून देतात. (१५०) ३५ विनोक्ति-लक्षण, दोहा विना कळू जहँ बरनिए, कै हीनो के नीक। ताको कहत विनोक्ति हैं, कवि भूषन मति ठीक ॥१५२१॥ जेथे एकादी वस्तू दुस-या एकाद्या वस्तूवचन हीन अथवा उत्तम समजली जाते तेथे ‘विनोक्ति अलंकार होतो. (१५१)