पान:संपूर्ण भूषण.djvu/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{2---- शिवराज-भूषण ५ हय गज लक्खन संचरइ । यक्कड़ गयन्द यक्कइ तरंग किमि सुरपति सरवरि करइ ॥१४७॥ त्रिभुवनत हे प्रसिद्ध आहे की, त्याने (इंद्राने) एकाच शत्रूचा (वृत्रासुराचा) नाश केला; पण ह्या (शिवाजी)ने अनेक शत्रूचा पराभव करून युद्धक्षेत्र शोभिवंत केले. भूषण म्हणतो, तो (इंद्र) एकाच ऋतूंत पृथ्वीची शोभा वाढवितो; पण हा (शिवाजी) सहाही ऋतूंत रात्रंदिवस तिची शोभा अपार वाढवीत आहे. शहाजी पुत्र शिवाजीच्या बरोबर नेहमीं लाखों हत्ती, घोडे वावरत असतात; मग एकच हत्ती ( ऐरावत ) आणि एकच घोडा (उचैश्रवा) बाळगणारा बापडा इंद्र द्या (शिवाजी)ची साम्यता कशी पाईं शकेल ? (१४७) उदा० २ रे-कावत्त मनहरण दारुन दुगुन दुरजोधन ते अवरंग भूषन भनत जग राख्यो छल सद्धि के । धरम अरम, बल भीम, पैज अरजुन, नकुल अकिल, सहदेव तेज, चढ़ि कै ॥ साहि के सिवाजी गाजी, करया दिली माँहि चंड पांडवन हू ते पुरुषारथ सुबढि कै। सूने लाख भौन ते कढे वै पांच राति, तें जु द्योस लाख चौकी ते अकेलो आयो काढ़ि कै ॥ १४८ ॥ भूषण म्हणतो, दुधनापेक्षाही दुप्पट पठोर असलेल्या औरंगजेबाने सर्व जगास कपटाने फसविलें. शून्य लाक्षागृहांतून पाँचही पाँडव रात्रीचे वेळीं (धर्म आपल्या धर्माचरणाच्या, भीम बळाच्या, अर्जुन क्षात्रोचित बाण्याच्या, नकुल बुद्धीच्या व सहदेव आपल्या तेजाच्या प्रभावानें) 'उन गेले; पण शहाजी पुत्र धर्मवीर शिवाजी ! तू दिल्लीत पडवापेक्षाही अधिक पराक्रम करून भर दिवस शंकडों चौक्या (पहारे) ओलांडून एकटा सुटून आलास ! (१४८)