पान:संपूर्ण भूषण.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• श्रीशिवराज-भूषण ५ उदा०—दोहा सोभमान जगपर किये, सरजा सिवा खुमान । साहिन सो विनु डर अगड, बिन गुमान को दान ॥१५॥ सर्जी शिवाजीने जगतास शोभायमान अशा दोन गोष्टी केल्या; एक बादशहाचे भय न बाळगता मानाने राहणे व दुसरी अभिमानरहित दान करणे. (१५२) उदा० २ ३-मालती सवैया को कविराज विभूषन होत विना कवि साहि तनै को कहाए ?।। को कविराज सभाजित होत सभा सरजा के विना गुन गाये १ ॥ को कविराज भुवालन भावत भौसिला के मन मैं विनु भाये ? ॥ को कविराज है गज वाजि सिवाजी की मौज मही विन पाए ? ‘शिवाजीचा घाव' म्हणविल्यावाचून कोण कवि शिरोमणि होऊ शकेल ? - सजी शिवाजीचे गुणवर्णन केल्यावाचून कोण कवी सभाजित् होईल ? भोसल्याच्या मनाला आवडल्यावाचून कोण कवि राजप्रिय होऊ शकेल ? पृथ्वीवर शिवाजीची कृपा संपादन केल्यावाचून कोण कवि हत्तीघोङयावर बसू शकेल ? (१५३) उदा० ३ –कवित्त मनहरण । बिना लोभ को विवेक बिना भय युद्ध टेक साहिन सों सदा साहि तनै सिरताज के । बिना ही कपट प्रीति बिना ही कलेस जीति बिना ही अनीत रीति लाज के जहाज के । सुकवि समाज बिन अपजस जस भनि भूषन भुसिल भूप गरीब नेवाज के । बिना ही बराई ओज बिना काज घनी फौज बिना अभिमान मौज राज सिवराज के ॥ १५४ ।। शंहाजी पुत्र शिवाजीची बादशहाशी निःस्वार्थ बुद्धीने व निर्भयपणे युद्ध करण्याची नेहमींची रीत आहे. ह्या विनयी शिवाजीचे प्रेम नि कपट आहे व तो अनीति न करिता व कष्ट न देता (शत्रूस) जिंकतो.