पान:संतवचनामृत.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६ १०० १००. ते दिसते पण हाती धरवत नाही. मन मुरे मग जे उरे । ते तूं कां रे सेवीसि ना ॥ दिसते परी न धरवे हाते । ते संतांते पुसावें ॥ तेथींची खूण विरळा जाणे । निवृत्तिप्रसाद ज्ञानदेवो म्हणे॥ १०१. देहावांचून देवाचें आलिंगन. कोठिची भरोवरी सरोनि गेली शरीरीं । संसाराची उरी कांही नुरेचि गे माये ॥ लक्षाचा लाभ मज घडला गे माये । कवणे उपायें चरण जोडिले वो॥ चिंतनी चिंतितां काय चिंतावें। ते अवघेचि मनी रूप गिळावें गे माये ॥ बाप रखुमादेवीवरु देहेंविण आलिंगिला। तो समर्थ माल्हाथिला बाईये वो ॥ १०२. " तें रूप देखें परी बोलवेना." देऊनियां भेटी मजसी न करी गोठी । लांचावला जीऊ पाठी न राहे वो॥ निष्ठुर म्हणों तरी आपंगितो माते। व्यापूनि जिवाते उरी उरवितो ॥ तो दाखवा वो माये धरिन त्याचे पाये। तयालागी जीऊ आहे उतावेलु ॥ १ सामुग्री. २ बाकी. ३ आश्रय करणे. ४ आपलासा म्हणणे, स्वीकार करणे.