पान:संतवचनामृत.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

F१०४] ५७ स्वरूपसाक्षात्कार. भेटीचेनि सुखे मनचि होय मुके। ते रूप देखें परी बोलवेना ॥ अगुणगुणाचा म्हणौनि घातली मिठी। तंव तो आपणया समसाठी करुनि ठेला ॥ काय नेणों कौमाण कैसे वो जालें। चित्त चोरुनी नेले गोवळेने ॥ बाप रखुमादेवीवर विठ्ठले अंग लपवूनि । चैतन्य चोरूनि नेले गे माये ॥ १०३. " घडिये घडिये गुज बोल कारे." तुझीये निडळी कोटि चंद्र प्रकाशे । कमळनयन हास्यवदन हांसे॥ कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये गुज बोल कां रे॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो। बाप रखुमादेवीवरु . विठ्ठल नाहो ॥ १०४. ज्यास आत्मज्ञान दृष्टीस दिसत नाहीं त्यासी गोष्टी करूं नये. आत्मज्ञान जया न देखे निजदृष्टीं। तया नरा गोष्टी करूं नये ॥ तुर्यारूपे जाण प्रभा हे निःसीम । तया परता राम असे बापा ॥ ज्ञानदेवा गुज दाविले गुरूनें । मने अनन्ये काल्पतांचि ॥ १ कार्य. २ कपाळ. ३ नवरा.