पान:संतवचनामृत.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९] स्वरूपसाक्षात्कार. ९६, देवा, तूं व मी आतां एकच घोंगडें पांघरूं. तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळीक ॥ मीतूंपण जाऊं दे दुरी । येकचि घोंगडें पांघरों हरी॥ रखुमादेवीवर विठ्ठलुराया। लागेन मी पायां वेळोवेळां ॥ ___९७. मीच प्रत्यक्ष निवृत्तिरूप बनलों. निरंजनवना गेलिये साजणी । तेथें निर्गुणे माझा मनीं वेधियेले ॥ सुखाची अतिप्रीति जाहली गे ब्रह्मीं। श्रीगुरु निवृत्तिमुनि मी जाहलों गे माये ॥ .. बापरखुमादेवीवरु विठ्ठलु सहजावला । निर्गुण दाविला विसुरा गे माये॥ ९८. तत्वमसिचा साक्षात्कार. तूं तो माझे मी तो तुझें । ऐक्य जाले तेथे कैंचे दुजें ॥ तूं तो मी गा मी तो तूं गा । अज्ञाने बापुडी नेणती पैं गा॥ निर्गुण होते ते गुणासि आलें । अज्ञान निरसूनि एकचि जालें। ज्ञानदेव म्हणे परतूनि पाहीं । जीवाचा जीवनु कवणे ठायीं॥ ९९. निजब्रह्माचें चक्षुवीण पाहणे, व हातेंवीण स्पर्श करणे, चातकेंविण लक्ष अंतरीच ठसलें । तेथें एक वोळले ब्रह्ममेघ ॥ ते जीवन अमृत जीवासि आले । त्याहूनि एक आगळे गे माये ॥ रखुमादेवीवरु हातेविण स्पर्शले । चक्षुवीण देखियले निजब्रह्म . गे माये ॥ - १ दीन. २ आश्चर्यरूप. ३ प्राण. ४ वळणे, प्राप्त होणे,