पान:संतवचनामृत.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ संतवचनामृत : ज्ञानदेव. डोळियांतील बाहुली करूं नये वेगळी। . धांवोनि अळी धरितां नये ॥ विठ्ठलरखुमाईचे भांडणी कोण करी बुझावणी । तया विठ्ठलचरणी ज्ञानदेवो ॥ ९४. प्रपंच पाहणे आतां पुरें; स्वरूपाच्या आनंदात राहणे हेच श्रेष्ठ होय. .. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे । योगराज विनवणे मना आले वो माये ॥ देह बळी देउनी साधिलें म्यां साधनी । याने समाधान मज जोडले वो माये ॥ अनंगपण फिटले मायाछंदा सांठवलें। सकळ देखिले आत्मस्वरूप वो माये ॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला। तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणे । निजानंदी राहणे स्वरूपी वो माये ॥ ऐसा ज्ञानसागरु रखुमादेवीवरु । विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला वो माये ॥ ९५. आंत विठ्ठल, बाहर विठ्ठल, मीच विठ्ठल असे मला वाटत आहे. मजमाजी पाहतां मीपण हारपले। उकलौच ठेले सये मन माझे ॥ आंत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु । मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥ मीपण माझे नुरेचि कांहीं दुजे। ऐसे केले निवृत्तिराजे म्हणे ज्ञानदेवो॥ १ अंचल, पदर. २ समजूत.