पान:संतवचनामृत.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६९३] स्वरूपसाक्षात्कार, __ ५३ ९२. ज्याच्या भेटीस गेलें तोच मी होऊन ठेलें. भेटिसी गेलीये तंव तेंचि जालीये। भुलली ठेलीये मज न कळे काहीं॥ परतलिया दृष्टी जंव मागुता न्याहाळीं। तंव काळी ना सांवळी मूर्ति चोजवेना ॥ काय सांगों माये न कळे तयाची सोये । येणे मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥ आंतु बाहेरी कैसी भरले निरंगें। क्षेम देऊ गेले अंगें तंव तो जडूनि ठेला ॥ वारितां नावरे काय सांगों माय गोठी । करूनि ठेला सौठी जीवित्वेसीं ॥ आशेचिये हांवे तंव तो परताचि धांवे । निराशेसि पावे वेळुन लागतां ॥ बाप रखुमादेवीवरु विठ्ठली उपावो। ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥ ९३. सर्वेश्वराच्या स्वरूपाचा निर्धार कोणास करितां येईल ? मलयानिळ शीतलु पौलवी नये गाळू। सुमनाचा परिमळु गुंफितां नये । तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों नये सान थोरु । याच्या स्वरूपाचा निर्धारु कवण जाणे ॥ मोतियाचे पाणी भरूं नये वो रांजणीं । गगनासी गवसणी घालितां नये ॥ १ मार्ग. २ रंगरहित. ३ अदलाबदल. ४ पदर. ५ खाळ.