पान:संतवचनामृत.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृतः ज्ञानदेव. [ące बाप रखुमादेवीवर विठ्ठलराये । माझे सबाह्याभ्यांतर व्यापिले गे माये ॥ ९०. देवाच्या दर्शनाने दृष्टीचा नाश. पावलो जी म्हणे देखिले देखणे । गेली आधी तेणे दृष्टि माझी ॥ उचललिया बाह्या क्षेम देईन तया । गेली माझी माया देहत्यागें॥ आनंदें स्फुदत येती अश्रुपात । अगा गुरुनाथ देवराया ॥ निवृत्तिदास म्हणे तूते जीवें वोवाळिलें । शिर निरोपिले तुझ्या चरणी॥ ९१. रूपाचा दर्पण पहात असतां द्रष्टाही नाहीसा होतो. स्वरूपाचेनि भाने बिंब हे ग्रासिलें। परि खूण न बोले काय करूं। रूपाचा दर्पण रूपैविण पाहिला। द्रष्टाही निमाला नवल कायि ॥ जिकडे जाये तिकडे दर्शन सांगाती । उदो ना अस्तु हे नाही द्वैतस्थिती ॥ध्रु.॥ पूर्वबिंब शून्य हे शब्दाच निमाले । अनाम्याचेनि भले होते सुखें । त्यासि रूप नांव ठाव संकल्प आणिला । अरूपाच्या बोला नाम ठेला ॥ वाप रखुमादेवीवरु विठ्ठलुचि एक। भोगी समसुख ऐक्यपणे। अदृश्य अंबुलो जागतां निविजे। परि सेस्वभावी दुजे नाही रया ॥ नवरा. २ शय्या.