पान:संतवचनामृत.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

$ ८९] स्वरूपसाक्षात्कार, सम तेज पाहे तंव एकचि वो तेज। ओंकार सहज निमाला तेथे॥ मूळचि मूळखूण न सांपडे सर्वथा।व्यांपिलें गे चित्ता तेजे येणे॥ स्वानुभव ते दिवटी उजळूनि जंव पाहे । तंव एक बिंब दाहे दिशा दिसे ॥ ज्ञानदेव निवृत्ति हे खूण पुसत । सांगावे त्वरित गुरुराजे ॥ ८८. रूप पहात असतां पात्यास पाते सुद्धा लागत नाही. तुझी गुणकीर्ति ऐकोनि आर्ते मन उचलले। आलिंगना धाविनले उतावीळ ॥ तनु मनु विगुंतले मन वाचा गुंतलें । मी माझे विसरले दर्शन गे माये ॥ उतावळेपणे भुजा दंड उचलले। नेणोनि ठकले ठेले रूप पाहतांचि बाईये॥ पातिया पाते नलगे पाहाणे तेंचि ठेलें। तैसे बाप रखुमादेवीवरविठ्ठले केले गे माये ॥ ८९. पाहता पाहतां तन्मयावस्था. चैतन्य चोरुनी नेले चित्त माझे सर्वे गेले। पाहे तंव तंव तन्मय जाले गे माये ॥ देवे नवल केले मन माझे मोहिलें। विसरूं तो आठवू जाला गे माये ॥ यासि जाणावयालागी अनुउते पाहे । तंव त्रिभुवन तन्मय जालें गे माये ॥ - १ रूप. २ उत्कट इच्छा. ३ तटस्थ. 33820