पान:संतवचनामृत.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. संतवचनामृत : ज्ञानदेव. [§uc दृढ विटे मन मुळीं । विराजित वनमाळी ॥ आजि सोनियाचा दिनु । वरि अमृताते वरुषे धेनु ॥ बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥ बाप रखुमादेविवरु । कृपासिंधु करुणाकरु ॥ ७९. "मुकियाचे परी आनंदु भीतरी." जाणों गेले तंव जाणणे राहिले। पाहों गेलिये तंव तेचि जाले गे माये ॥ इंद्रियांसहित चित्त ठकलौच ठेलें। मी माझे विसरले स्वये भाव ॥ ऐकोनि देखोनि मन होये आंधळे । परतोनि मावळे नाही तेथे ॥ अविद्या निरसली माया तुटली । त्रिगुण साउली तेथे रूप कैंचें ॥ चांग विचारिलें विवेके उगवले ! शान हारपले तयामाजीं ॥ मुकियाचे परी आनंदु भीतरी। अमृत जिव्हारी गोड लागे । बाप रखुमादेवीवरु विठ्ठल जागे । संत ये खुणे संतोषले ॥ ८.. आनंदमयस्वरूपाचे सर्वत्र दर्शन.. गुजगुजित रूप सांवळे सगुण । अनुभवितां मन वेडे होय ॥ भ्रमरगुंफा ब्रह्मरंध्र ते सुरेख । पहातां कौतुक त्रैलोकीं ॥ १ ढग. २ विस्मित होणे. ३ चांगलें.