पान:संतवचनामृत.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८३] स्वरूपसाक्षात्कार. आनंद स्वरूप प्रसिद्ध देखिलें । निजरूप संचले सर्वा ठायीं ॥ __' शानदेव म्हणे या सुखाची गोडी। अनुभवाची आवडी सेवीरया। ८८१. विठ्ठलांमध्ये मुरून राहण्याचा आनंद संतजनांच्या माहितीचाच आहे. दुधावरिली साय निवडूनि दिधली। तैसीपरी जाली आम्हां तुम्हां। धालों मी ब्राँ उद्गारसंभ्रमे । अनुदिनी प्रेमें डुल्लतसे ॥ नाठवे आशा देहावरि उदास । मीतूंपण भास चौजवेना ॥ रखुमादेवीवरविठली मुरोनि राहिला।तो आनंदु देखिलासंतजनी॥ ८२, साधुबोधाने कापुराच्या ज्योतीप्रमाणे साधक आपल्यांतच मुरून जातो. साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभव ।। कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ति झाली जैसी॥ मोक्षरेखें आला भाग्य विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥ - ज्ञानदेवा गोडी संगति सजनीं । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं॥ ८३. जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ति या अवस्थांचा विसर. माझे जीवींची आवडी । पंढरपुरा नेइन गुढी । पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंदी आनंद सांठवे ॥ बाप रखुमादेवीवर सगुण निर्गुण । रूपं विटेवरी दाविली खूण ॥ १ भरलें. २ तृप्त होणे. ३ आवडत नाही, विचारांत येत नाही. ४ शोभला. ५ पताका. ____सं...४ . .