पान:संतवचनामृत.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ६७८] स्वरूपसाक्षात्कार. ४७ ९. स्वरूपसाक्षात्कार. ७६. निवृत्तिनाथांनी नीच नवा विठ्ठल माझ्या देही दाखविला. रूप सामावले दर्शन ठाकले । अंग हारपलें तोच भावीं ॥ पाहो जाय तंव पाहाणया वेगळे। ते सुखसोहळे कोण बोले । जेथ जाय तेथे मौनचि पडिले । बोलवेना पुढे काय करूं ॥ सरिता ना संगम ओघ ना भ्रम । नाहीं क्रियाकर्म तैसे झाले ॥ जाणों जाय तंव जाणणयासारिखें। नवल विस्मय देखे कवणा सांगों बाप रखुमादेवीवरु विठ्ठलुची अंगीं । निवृत्तिराये वेगी दाखविला॥ आदिअंती तोचि सबरीभरितु । रूपनामरहितु नीचनवा ॥ ७७. देवाच्या देवास मी अनंतवेषाने अनंतरूपाने पाहिले. योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण । अनंतवेषे अनंतरूपे देखिले म्यां त्यासी ॥ रखुमादेवीवरी खूण बाणली कैसी ॥ ७८. आज आत्मारामास देखिल्याने दिन सोनियाचा झाला आहे. आजि देखिले रे । आजि देखिले रे ॥ सबाह्य अभ्यंतरी । अवघा व्यापकु मुरारी ॥ १ राहिले. २ संपूर्ण भरलेला. ३ नित्य नवीन. ४ गडे.