पान:संतवचनामृत.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. मानण्यास हरकत नाही. याचे कारण एक तर या ज्ञानदेवांच्या समाधीचा उत्सव कार्तिक वद्य १२।१३ स होतो. व दुसरें, आपेगांव येथील कुलकण्याच्या दप्तरावरून या "ज्ञानेश्वरांच्या समाधीकडे" जमीन लावून दिली गेली आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होते. (क) शिवाय अभंगांची व ज्ञानेश्वरीची भाषा इतकी भिन्न आहे की त्या दोहींचा कर्ता एकच असू शकत नाही. या तीन्ही मुद्यांस पुढीलप्रमाणे उत्तरे देतां येण्याजोगी आहेत. (१) आपेगांवकर ज्ञानदेव हे जर शैव होते तर आपेगांवच्या समाधीच्या मागे विट्ठलरखुमाईच्या मूर्ति का आहेत ? व आळंदीकार ज्ञानेश्वर हे जर रा. भारद्वाज यांच्या मताप्रमाणे विठ्ठलभक्त होते तर त्यांनी सिद्धेश्वरापुढे म्हणजे शिवाच्या लिंगापुढे समाधि का घेतली ! या गोष्टींचा उलगडा असा आहे की, ज्ञानेश्वरीकार व अभंगकार एकच असल्याने त्यांस शिव असो अगर विठ्ठल असो, यांमध्ये भेद नव्हता. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलभक्ति आहे किंवा नाही याची चर्चा या मालेतील ग्रंथांक १ च्या प्रस्तावनेत केलीच आहे.. त्यावरून असे निष्पन्न होते की, ज्ञानेश्वरीत विठ्ठल असा शब्द जरी आला नसला तथापि ज्ञानेश्वरीकाराचा विठ्ठलभक्तीशी खात्रीने परिचय असावा असे दिसते. तसेच अभंगांमध्ये केवळ विठ्ठलभक्ति नसून "स्वर्ग जयाची साळोखा" अशा प्रकारच्या त्रिभुवन व्यापणा-या शिवाच्या लिंगाचीही भक्ति सांगितली आहे. (के. ६६). (२) आपेगांव येथे ज्या समाधीचा कार्तिक वद्य १२ स व १३ सा उत्सव होतो ती ज्ञानेश्वरांची मूळची समाधि नसून ती केवळ ज्ञानेश्वरांच्या नावाने केलेली असावी असे दिसते. अशाच प्रकारच्या ज्ञानेश्वरांच्या समाधि नानज, पुंसेसावळी, वगैरे ठिकाणी आहेत. संतांस मान देण्याच्या इच्छेनें, अगर त्यांची स्मृति रहावी म्हणून, अगर त्यांची भक्ति वाढविण्याच्या इच्छेने त्यांच्या समाधि एकापेक्षा जास्त ठिकाणी करण्यांत येतात हे सर्वविश्रुतच आहे. शिवाय ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगांव येथे झालेला असल्याने त्यांची खरी समाधि आळंदी येथे असली, तथापि त्यांच्या नावाने आपेगांवास दुसरी समाधि करणे हेही योग्यच ठरते. याच समाधीचा उत्सव चालावा म्हणून आपेगांवचे उत्पन्न या समाधीकडे, लावून दिले असावे. (३) आतां ज्ञानेश्वरी व अभंग यांची भाषा भिन्न आहे म्हणून ज्ञानेश्वर दोन निरनिराळे समजले पाहिजेत, या मतास उत्तर इतकेंच आहे, की अभंगाची भाषा नेहमी लोकांच्या तोंडातून गेली असल्याने ती ज्ञानेश्वरीच्या भषिपेक्षा किंचित् आधुनिक दिसले यांत संशय नाही. ज्ञानेश्वरी का अध्यय च ...