पान:संतवचनामृत.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना.. (क..१६) हे विश्व श्रीकृष्णाने व्यापिलें असल्याने या जगांत ज्या गोष्टी.. घड़तात त्या सर्व कृष्णरूपांतच होत जातात (क्र. १९). अंधाऱ्या रात्री ज्याप्रमाणे सूर्य उगवावा त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे रूप उदयास येऊन गुरुरुपर्ने ते केव्हांच अस्तवत नाही असा चमत्कार होतो (क्र. २२). ईश्वराचा सुगंध चंदनाच्या वासापेक्षा, जाईजुईच्या परिमळापेक्षां, अगर कल्पतरूच्या सुगंधापेक्षाही श्रेष्ठ आहे (क्र. २७). तेज आणि सुगंधाप्रमाणे ईश्वराचा शब्दही आनंदमय रीतीने प्राणापानांचे मथन झाल्यावर आंतल्या आंत उमटतो, व त्याच्या अनुसंधानामुळे गुरुनाममंत्र दृढतर होतो (क्र. २९). परंतु या अनुभवाच्या गोष्टी लोकांची बुद्धि विषयविषाने धारिली असल्याने त्यांस प्रतीत होत नाहीत (क. ३१). निवृत्तिनाथ मात्र चातकाप्रमाणे हरीस्तव आकाशाकडे दृष्टि ठेवून वरती पाहतात (क्र. ३२) एखाद्या दिवट्याप्रमाणं देहांत परापश्यंत्यादि चारी वाटा देव प्रकाशमान करतो. .(क्र. 30); त्या तेजांत ताराग्रहमेदिनी यांचा लोप होऊन सर्वत्र जनार्दनरूप भासते (क्र. ३६). आकाशांतील पोकळी नाहीशी होऊन तेथेहिः हरि घनदाट भरलेला दिसतो (क्र. ३७). निवृत्तिरूप घट सर्वत्र बिंबलेला दिसत असल्याने आत्मरूप पाहण्यास दर्पणाची जरूरी रहात नाही (क. ३८). हे आत्मरूपच गोसावीरूपाने अगर गहिनीरूपाने आम्हांस दिसते (क्र.४१); आणि देव व भक्त व गुरु यांचा त्रिवेणीसंगम होऊन सर्व विश्वच देवाने भरलेले दिसते (क. ४), अशी एकंदरीत निवृत्तिनाथांची शिकवण आहे. ४. निवृत्तिनाथांच्या अभंगचर्चेनंतर आपण आता ज्ञानेश्वरांच्या अभंगचर्चेकडे 'वळू. येथे ही एक गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की काही वर्षांपूर्वी रा. भारद्वाज यांनी अभंगकार ज्ञानेश्वर निराळे, व ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वर निराळे, अशी एक कल्पना पुढे मांडली होती. त्यावेळी रा. भिंगारकर यांनी न्यायमूर्ति रानडे वगैरच्या सहाय्याने त्यांच्या मताचे सप्रमाण खंडण केले होते. हा वाद येथे पूर्णपणे पुनः सांगण्याचे कारण नाही. तथापि ज्ञानेश्वरीकार व अभंगकार हे दोन निरनिराळे होते किंवा काय याबद्दलचा खुलासा थोडक्यांत येथे करणे जरूरीचें आहे. रा. भारद्वाज यांच्या मते (१) ज्ञानेश्वरीकार ज्ञानदेव हे आपेगांवास असून ते शेव होते, व अभंगकार ज्ञानदेव हे आळंदीस असून ते विठ्ठलभक्त होते. : (२) आपेगांव येथे जी दुहेरी समाधि दाखविण्यात येते, त्यांपैकी एक ज्ञानेश्वरांचे अणजे त्रिंबकपंत यांची मानिली, तथापि दुसरी समाधि, ज्ञानेश्वरांची आहे असे ,