पान:संतवचनामृत.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - . . . বলল, नाच्या ग्रंथ आहे, आणि अभंग हे पाठ म्हणण्याचे आहेत. अभंगांतील व्याक-:: रणाची रूपें. अगदी ज्ञानेश्वरीबरहुकूम का नाहीत याचेही हेच कारण आहे... तथापि ही गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की बरेचसे मूळचे शब्द जे ज्ञानेश्वरीत येतात ते अभंगांतही दृष्टीस पडतात. . उदाहरणार्थ, " साइखेडिया, बिक, “पाने- : जोनि, नीचनवा, बरवंट, बुंथी, गळाळा, संवसाटी, खडाणी, सिंतरणे, वाडेकोर्डे पारिखे, " व असेच कित्येक शब्द ज्ञानेश्वरी व अभंग यांन सारखेच आहेत. यावरून ज्ञानेश्वरी व अभंग यांचे शब्दभांडार एकच आहे हे सिद्ध होतें. ()' या तीन वर दिलेल्या कारणांखेरीज आणखीही काही कारणे दोनी ज्ञानेश्वर एकच होत हे.दाखविण्याकरितां देतां येण्याजोगी आहेत. त्यांतून आपण येथे एकाचाच विचार करूं. शब्दभांडाराप्रमाणेच ज्ञानेश्वरी व अभंग, अगर अमृतानुभव आणि अभंग, यांचे विचारभांडारही एकच आहे हे सहज दाखविता येण्याजोगे आहे. हा विषय मोठा असून याचा कोणी सांगोपांग अभ्यास केला पाहिजे. तून दोन चारच मासले येथे दाखवितो. . या पुस्तकांत दिलेल्या ज्ञानेश्वरांच्या अभंगांतील । क्रमांक ९३ “ मलयानिळ शीतळु । पालवी नये गाळु । सुमनाचा परिमळु । . गुंफितां नये"; कमांक ३५ " श्रीगुरु सारिखा असता पाठिराखा ।...राजयाची.. कांता काय भीक मागे । कल्पतरुतळवटी जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी"; क्रमांक १३ सपै मैं दर्दर धरियेला रे मुखीं । तेपोंही रे माशी धरियेली पक्षी" क्रमांक ५ " मिथ्या मोहफांसा । शुकनळिके जैसा । मुक्त .. परि आपेसा । पळों नेणे"; पुनः क्रमांक ५ “ राखोंडी फुकिता दीप न लगे" क्रमांक १००" दिसतें परी न धरवे हातें । तें सतातें पुसावें" या सर्वांस' ज्ञानेश्वर्तिन अत्यंत सदृश अशा ओव्या सहज दाखविता येतील. त्याप्रमाणेच ज्ञानश्वरांचे आणखी काही अभंग " मृगजळाच्या जळीं । चारिशी जळचरें.", " स्तुति ते तुझी निंदा । स्तुतीजोगा नव्हेसी गोविंदा " • यांस व ज्ञानेश्वरअभंगांच्या क्रमांक ८६ मधील “ नारीपुरुष दोघे । एकरू दिसती । ज्ञानदेव म्हणे शिव तेचि शक्ति । पाहतां व्यक्ती व्यक्त नाहीं " यास सदृश 'उतारे अमृतानुभवांतून दाखविता येतील. एकंदरीत ज्ञानेश्वरी व अभंग, आणि अमृतानुभव व अभंग, यांमध्ये कल्पनांचे इतके साम्य आहे की, ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ज्या लेखणीतून उतरले त्याच लेखणीतून अभंग्रही उतरले असले पाहिजेत असें निश्चित रीतीने म्हणण्यास हरकत दिसत नाही. .