पान:संतवचनामृत.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५२] प्रातिभश्रावणादर्श. चोवीस मावली अगाधपंथीं ॥ प्रीतीचे पांघरूण काळे घोंगडें । रखुमादेवीवर विठ्ठले मज केले उघडे ॥ ५०. कृष्णवर्ण आत्मरूपाचे दर्शन. काळा पुरुष तोहागगनांत जो नांदे । अनुभवाच्या भेदे भेदलाजो॥ भेदून अभेद अभेदून भेद । सच्चिदानंद जेथ नाहीं ॥ ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला। आत्माम्यां पाहिला या दृष्टीसी॥ ५१, माझ्या दृष्टीने सांवळ्या रूपाचा आश्रय केला आहे. काळा लपंडाई काळे रात्री खेळे । मी स्वैसवें वेधली जाय काळ्या छंदें । काळे निळे हे अभ्र भासले । ऐसे रूप देखिले निर्गुणाचें ॥ ऐसा हा सांवळा माझिये दृष्टी मौल्हाथिला। उजरूनि गेला हा विठ्ठलु गे माये ॥ ऐसे भुलविले जाण काळेपणे आपणे । रखुमादेवीवर जाणे येर कांहीं नेणे ॥ ५२. नीळरूपाचे वर्णन. निळे हे व्योम निळे हे सप्रेम । निळेपणे सम आकारले ॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ नीळपण वत्तौ नीळपणे खातो। निळेपण पाहातों निळेपणे ॥ शानदेव आला नीळवर्ण शाळा । निळेपण गोवळा रातैलीये ॥ १ लपंडाव. २ आपोआप, आपणच. ३ आश्रय पावणे. ४ चकाकणे. ५ राहणे. ६ कृष्ण, ७ रमणे.