पान:संतवचनामृत.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ - संतवचनामृत : ज्ञानदेव. E&rc ४८. “काळा दादुला मज पाचारी गे माये." सुखाचा निधि सुखसागर जोडला। म्हणोनि काळा दादुला मज पाचारी गे माये ॥ प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी । काळे वनमाळी आले घरा गे माये ॥ बाप रखुमादेवीवर पुरोनि उरला। सबाह्यजू भरला माझे हृदयीं गे माये ॥ ४९, काळ्या जगजेठीचे दर्शन. आठवितां न पुरे मोवितां न मोवथे। सांगतां न सांगवे गुण त्याचे॥ परतली दृष्टि काळा देखिला जगजेठी। वेणीभागी पृष्ठीं कैसा दिसतु असे ॥ त्या गुणाच्या संगे कैसे अद्वैत जालें। मन म्हणौनि काळेपण बहु झाले गे माये ॥ पुरे पुरे बुद्धि निमाली वेदवाणी। आतां केविं वर्ण चक्रपाणी बहु काळे गे माये ॥ द्वादश मंडळे वोवाळुनी आलिये। तंव तंव काळे देखिलें रूपडे त्याचें ॥ अनुमाना नये अनुमाना नये। परतल्या श्रुती चोजवेना ॥ बुडी दिधली दाहीं हारपलीं। १ नवरा. २ बोलावणे. ३ नवाई, कोमलपणा. ४ आंतबाहेर. ५ मोजणे. ६ डोक्यावर. ७ समजणे.