पान:संतवचनामृत.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६५३ ___५३. नीळवर्णाने आकाश खाऊन टाकिलें. नीळवर्णरजें नीळवर्ण बुझे । नीळिमा सहजे आकारली ॥ नीळप्रभा दिसे नीळपणे वसे । नीलिये आकाश हारपले ॥ निळेपण ठेले निळिये गोविले । निळेपण सोविळे आम्हां जाले ॥ ज्ञानदेव निळा परब्रह्मीं गोविला। कृष्णमूर्ति सांवळा हृदयीं वसे॥ ५४. ज्ञानदेवांनी सांगितलेली अनुभवाची खूण. कैसे बोटाने दाखवू तुला । घेई अनुभव गुरुच्या मुला ॥ध्रु.॥ ज्या ठायीं चळे ना ढळे । आकळितां कोणा नाकळे । विश्व तयाचे सत्तेने चाले । कैसे बोटाने दाखवू तुला ॥ मागे पुढे सर्वे आसते । तुझ्या पायाखाली तुडवितें। तुझ्या दृष्टीपुढे दिसते गा। कैसे बोटाने दाखवू तुला ॥ ही खुण त्वां ओळखुनि ध्यावी । गुरुपुत्राला जाउनी पुसावी । ही खुण सांगितली ज्ञानदेवें । कैसे बोटाने दाखवू तुला ॥ ५५. पाहणे पाहतांच अनुभवियांस बोलणें पारुषतें. पाहाणेचि पाहासी काय पाहाणे तेथें नाहीं। पाहाणेचि पाहीं पाहाणे रया ॥ खुंटले बोलणे बोली बोला। बोलुचि मौन्ये ठेलों मौन्यामाजीं ॥ बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचिये खुणे। अनुभविया बोलणे पारुषले ॥ १ समजणे. २ हलणे. ३ खुंटणे,